चिखली तालुका दुष्काळग्रस्त

चिखली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

Chikhli Taluka Drought: तालुक्यात गेल्या जवळपास महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेली पिके आता पाण्याअभावी करपली

चिखली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

Chikhli Taluka Drought

 

पिकांचे पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची चिखली तालुका काँग्रेसची मागणी

चिखली (Chikhli Taluka Drought) : तालुक्यात गेल्या जवळपास महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेली पिके आता पाण्याअभावी करपली असून, तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर चिखली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी चिखली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे बुधवार 16 सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी कर्ज काढून मोठ्या आशेने पेरणी केली. सुरुवातीच्या पावसामुळे पिके चांगली उभी राहिल्याने यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

आज शेतातील उभी पिके पाहताना शेतकऱ्यांसमोर पिके वाचतील का? कर्ज फेडता येईल का? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल?” असे प्रश्न उभे ठाकले आहेत. ही केवळ पिकांची हानी नसून शेतकऱ्यांच्या आशेवर झालेला मोठा आघात असल्याचे काँग्रेसने निवेदनात नमूद केले आहे.

प्रशासनाने चिखली तालुक्यातील (Chikhli Taluka Drought) सर्व गावांमध्ये पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत, पर्जन्यमान व पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घ्यावा आणि परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन चिखली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार दुष्काळी सवलती, पीक नुकसानभरपाई, पीकविमा आणि इतर आवश्यक मदत शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामभाउ जाधव, माजी अशोकराव पडघान, कृषीमित्र सचिन बोंद्रे, खरेदी विक्रीचे अध्यक्ष ईशवरराव इंगळे, युवक काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष अंबादास वाघमारे, चिखली तालुका किसान काॅग्रेसचे अध्यक्ष समाधान आकाळ, तालुका सेवादल अध्यक्ष रामभाउ भुसारी, तालुका पंचायत राज समिती अध्यक्ष गणेश जवंजाळ, शिवराज पाटील, समाधान गिते, शेषराव पाटील आंभोरे, परमेश्ववर साळवे, अंजाबराव देशमुख, संजय गिरी, भारत खासभागे, नितीन वाघ, सुनिल करंडे, गजानन जाधव, गजानन डुकरे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टैग्स: Chikhli Taluka Drought

संबंधित सामग्री

चिखलीसह घाटावरील तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यासह हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई अदा करा...

चिखलीसह घाटावरील तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यासह हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई अदा करा...

Chikhli Taluka Drought: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात आज कृषीमंत्री ना. दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. कृषीमंत्री विद्यापीठातील शिवार फेरीच्या कार्यक्रम

Sep 20, 2026
चिखली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तालुका किसान काँग्रेसची सरकारकडे  मागणी

चिखली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तालुका किसान काँग्रेसची सरकारकडे  मागणी

Chikhli Taluka Drought: गेल्या जवळपास महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपण्याच्या अवस्थेत

Sep 11, 2026