शेतकऱ्याचे नुकसान

महाराष्ट्रात विद्युत तारेमुळे शेतात आग, शेतकरीचे मोठे नुकसान

महाराष्ट्रातील सेनगाव येथे शेतकरी रामजी ग्यानबा इंगळे यांच्या शेतात विद्युत तारेमुळे आग लागून त्यांचे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले.

महाराष्ट्रात विद्युत तारेमुळे शेतात आग, शेतकरीचे मोठे नुकसान


सेनगाव : सेनगाव तालुक्यातील सिनगी नागा येथील शेतकरी रामजी ग्यानबा इंगळे यांच्या शेतात सोमवारी (दि. १६) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास तुटलेल्या विद्युत तारेमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत इंगळे यांचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इंगळे यांच्या शिवारातील गट क्रमांक १९८ मध्ये अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. उभे असलेले गव्हाचे पीक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून पूर्णपणे जळून खाक झाले. तसेच शेतातील पाइपलाइनसह विविध शेती साहित्यही आगीत भस्मसात झाले.

या दुर्दैवी घटनेत इंगळे यांचा एक बैल गंभीररित्या भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर आणखी संकट कोसळले आहे. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांच्या धाडसामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

एकीकडे निसर्गाच्या अवकृपेने त्रस्त असलेला शेतकरी, तर दुसरीकडे शेतीमालाला अपेक्षित भाव न मिळाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेला असताना अशा आगीच्या घटनांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026