महाविकास आघाडीकडून शैलेश अग्रवाल यांना उमेदवारीची शक्यता; चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढली

चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाविकास आघाडीकडून शैलेश अग्रवाल यांना उमेदवारीची शक्यता; चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढली

Maha Vikas Aghadi

चंद्रपूर (Maha Vikas Aghadi) : चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व वर्धा येथील रहिवासी शैलेश अग्रवाल यांच्या नावावर सहमती झाल्याचे बोलले जात आहे.

चंद्रपूर येथे आयोजित काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत उमेदवार निवडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस काँग्रेसचे निरीक्षक आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर तसेच माजी मंत्री रणजीत कांबळे उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणे, मतांचे गणित आणि निवडणुकीची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर शैलेश अग्रवाल यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती आहे.

शैलेश अग्रवाल हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य असून काँग्रेस किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. काँग्रेसकडून लवकरच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता असून त्यामध्ये शैलेश अग्रवाल यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतांचे गणित जुळवून आणणे आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची मते एकत्रित ठेवणे हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान असणार आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026