रामेश्वर तांडा स्मशानभूमी

अखेर स्मशानभूमीसाठी जागेची प्रशासनाने केली पाहणी

Rameshwar Tanda Crematorium: कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा  येथे  स्मशानभूमी अभावी मयतावर अंत्यसंस्कार  करण्यासाठी अडचणी येत असल्यासंदर्भात दैनिक देशोन्नतीमध्ये वृत्त प्रसिध्द होताच त्याची दखल

अखेर स्मशानभूमीसाठी जागेची प्रशासनाने केली पाहणी

Rameshwar Tanda Crematorium

 

दैनिक देशोन्नतीच्या वृत्ताची दखल

रामेश्वर तांडा (Rameshwar Tanda Crematorium) : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा  येथे  स्मशानभूमी अभावी मयतावर अंत्यसंस्कार  करण्यासाठी अडचणी येत असल्यासंदर्भात दैनिक देशोन्नतीमध्ये वृत्त प्रसिध्द होताच त्याची दखल घेत महसूल प्रशासनाने स्मशानभूमीसाठी गायरान भागाच्या जागेची पाहणी केली आहे. लवकरच येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध होणार असल्याने  गावकर्‍यातून समाधान  मानले जात आहे.

कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने या  संदर्भात ६ जुलै रोजी दैनिक देशोन्नतीने बातमी प्रकाशित करण्यात आली. याची दखल घेत  कळमनुरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एल. डी. डुकरे, ग्रामसेवक   अंगद लिंगायत यांनी  येथील गायरान जमिनीवर ग्रामस्थांचे समक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. आता लवकरच गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे  अंत्यविधीसाठी ग्रामस्थांच्या अडचण दूर  होतील.

यासंदर्भात  ग्रामसेवक यांनी लवकरच ठराव पारित करून वरिष्ठ अधिकार्‍यांना तो ठराव पाठवल्या जाणार असल्याचे सांगितले आहे यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

मुख्य शासकीय ध्वजारोहन प्रसंगी लोक प्रतिनिधींची अपमानास्पद वागणूक दिल्याने खा. रामराव वडकुते संतापले

मुख्य शासकीय ध्वजारोहन प्रसंगी लोक प्रतिनिधींची अपमानास्पद वागणूक दिल्याने खा. रामराव वडकुते संतापले

MP Ramrao Vadkute: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय ध्वजारोहन प्रसंगी लोक प्रतिनिधींना अपमानास्पद वागणुक दिल्याच्या कारणातून खा. रामराव वडकुते यांनी जिल्हा प्रशासनाची खरडपट्टी काढली.

Aug 16, 2026
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून औंढा नागनाथ तालुक्यात विविध विकास कामांची पाहणी

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून औंढा नागनाथ तालुक्यात विविध विकास कामांची पाहणी

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी औंढा-नागनाथ तालुक्यात शासकीय कार्यालये, ग्रामीण आरोग्यसेवा केंद्र, क्रीडा संकुल, महावितरण उपकेन्द्र, एसआयआर प्रक्रिया आणि रस्त्याची स्थिती

Aug 13, 2026
शिवसेना पक्षसंघटन व्यापक करण्यासाठी कामाला लागा: संपर्क प्रमुख चव्हाण

शिवसेना पक्षसंघटन व्यापक करण्यासाठी कामाला लागा: संपर्क प्रमुख चव्हाण

Latur Shiv Sena: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक भक्कम आणि व्यापक

Aug 06, 2026
कन्हान मध्ये भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारून सौंदर्यीकरण करून द्या..

कन्हान मध्ये भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारून सौंदर्यीकरण करून द्या..

Kanhan Birsa Brigade: बिरसा ब्रिगेड व आदिवासी समाजाचे प्रतिनिधी कन्हान नगरपरिषदेत भगवान बिरसा मुंडा यांना पुतळा उभारून सशोभित करण्याची मागणी करीत आली.

Aug 05, 2026
चाकूरकरांच्या स्मारकासह सर्व विषय बहुमताने मंजूर!

चाकूरकरांच्या स्मारकासह सर्व विषय बहुमताने मंजूर!

Shivraj Patil Chakurkar Memorial: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाच्या विषयासह विषय पत्रिकेवरील 28 विषय बहुमताने मंजुरी देत सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा विकास काम..

Aug 05, 2026