कयाधू नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात; मे महिन्यातील स्वच्छता मोहिमेचा परिणाम अल्पजीवी

जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कयाधू नदीत पुन्हा घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

कयाधू नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात; मे महिन्यातील स्वच्छता मोहिमेचा परिणाम अल्पजीवी

Kayadhu River

हिंगोली (Kayadhu River) : जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कयाधू नदीत पुन्हा घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील कचरा आणि सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस तयार झाला असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

विशेष म्हणजे, केवळ एक महिन्यापूर्वीच १ मे रोजी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते कयाधू नदी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून नदीपात्रातील कचरा काढण्यात आला होता. त्यावेळी काही दिवस नदीचे पाणी तुलनेने स्वच्छ दिसले. मात्र, सांडपाण्याचा प्रश्न कायम राहिल्याने आणि कचरा टाकणे थांबले नसल्याने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे.

कयाधू नदी हिंगोली जिल्ह्याच्या मध्यातून वाहत असल्याने तिला ‘जीवनवाहिनी’ मानले जाते. वाशीम जिल्ह्यातील अगरवाडी येथून उगम पावणारी ही नदी ९९ किलोमीटर प्रवास करून नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीला मिळते. मात्र, वाळू उपसा, पाणी उपसा आणि पाण्याचे सुनियोजन न झाल्याने ही नदी आता केवळ जून ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंतच वाहते.

सध्या शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. या दूषित पाण्यावर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती अवलंबून असून जनावरेही हेच पाणी पीत आहेत. त्यामुळे जनावरांमध्ये आजार उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यावरणप्रेमींनी नदीपात्र प्रदूषणमुक्त करण्याची मागणी केली आहे.

उगम ग्रामीण विकास संस्थेसह विविध संस्था कयाधू नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील आहेत. नदीवर साखळी बंधारे बांधण्याचे प्रस्तावही चर्चेत आहेत. मात्र, जोपर्यंत शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडण्यास प्रतिबंध होत नाही आणि कचरा टाकण्यावर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत केवळ मोहिमांमधून नदीचे आरोग्य सुधारणार नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

५० वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी कयाधू आज केवळ पावसाळ्यातच दिसते. एक दिवसाच्या मोहिमेऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना आणि लोकसहभागातूनच हिंगोलीची जीवनवाहिनी पुन्हा प्रवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
दिवाळीच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण 24 तासांची मुभाही नाही; सुप्रीम कोर्टाचा संतुलित पर्यायाचा संकेत

दिवाळीच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण 24 तासांची मुभाही नाही; सुप्रीम कोर्टाचा संतुलित पर्यायाचा संकेत

दिवाळीच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण 24 तास वापराची मुभाही नाही. सुप्रीम कोर्टाने ठरावीक वेळेचा पर्याय सुचवत CPCB ला 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली.

Sep 30, 2026
डीजेविरोधातील लढा ते निवडणुकीचे मैदान? विद्यानंद बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

डीजेविरोधातील लढा ते निवडणुकीचे मैदान? विद्यानंद बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

विद्यानंद बापट पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार? असीम सरोदेंच्या पोस्टनंतर चर्चेला वेग; मात्र बापटांची अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर नाही.

Sep 24, 2026