कांदा दर घसरण

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त; उत्पादन खर्चही निघेना..

Onion prices fall: रब्बी हंगामात कांदा पिकाच्या काढणीत वाढ असताना बाजारातील दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात. उत्पादन खर्च निघेनाशीवाय नफा दूरची गोष्ट बनली आहे.

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त; उत्पादन खर्चही निघेना..

Onion prices fall

पातूर (Onion prices fall) : सध्या रब्बी हंगामातील कांदा पिकाची काढणी जोरात सुरू असताना बाजारातील घसरलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावर्षी चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. मात्र बाजारात कांद्याचे दर घसरून केवळ 600 ते 700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे.

कांद्याच्या उत्पादनासाठी (Onion prices fall) साधारणतः 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल इतका खर्च येत असल्याने सध्याच्या दरात शेतकऱ्यांना नफा तर दूरच, खर्चही निघत नसल्याचे वास्तव आहे. साधारणतः हजार ते बाराशे रुपये दर मिळाल्यासच शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होतो. मात्र सध्या बाजारात त्यापेक्षा खूपच कमी दर असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दरम्यान, कांदा साठवणूक करणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. योग्य साठवण सुविधा नसल्याने आणि अवकाळी पावसाचा धोका असल्याने कांदा खराब होण्याची भीती कायम आहे. त्यामुळे कमी दरातच कांदा विकण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. तालुक्यात जलसिंचन सुविधेमुळे मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. बीज निर्मितीपासून काढणीपर्यंत (Onion prices fall) कांदा पीक अत्यंत खर्चिक आणि मेहनतीचे असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने हे पीक घेतले होते. मात्र बाजारातील घसरणीमुळे पुन्हा एकदा कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकंदरीतच, रब्बी हंगामातील कांदा पिकाकडून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

संबंधित सामग्री

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

Kurunda Farmers' Protest: भारतीय स्टेट बँक  शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026