जवळाबाजार येथे आपसी वादातून खुनाची घटना; संशयित आरोपी फरार 

जवळा बाजार : येथील ईदगाह नगर परिसरात शनिवारी पहाटे खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली.

जवळाबाजार येथे आपसी वादातून खुनाची घटना; संशयित आरोपी फरार 

Jawala Bazar Crime

जवळा बाजार (Jawala Bazar Crime) : जवळा बाजार येथील ईदगाह नगर परिसरात शनिवारी पहाटे खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली. दोन मित्रांमधील आपसी वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून संशयित आरोपी सध्या फरार आहे. मनोहर बाबू आप्पा साखरे असे मयत तरुणाचे नाव असून शनिवारी सकाळी ईदगाह नगरमधील एका रस्त्यावर त्याचा मृतदेह आढळून आला. घातक शस्त्राने चेहऱ्यावर वार करून चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक मीना, पोलीस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे तसेच जवळा बाजार पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस फौजदार माधव जिव्हारे व विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली. श्वान पथकाचाही वापर करण्यात आला; मात्र काही अंतरापर्यंत माग काढल्यानंतर पुढे तो निष्फळ ठरला.

प्राथमिक माहितीनुसार, हा खून एका घरात झाल्याचा संशय असून दोन मित्रांतील वादातून ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नेमका खून कोणत्या कारणावरून झाला, याबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत करत असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तैनात केली आहेत.

संबंधित सामग्री

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा

Sep 23, 2026
भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भद्रावतीत भर चौकात ४० वर्षीय उमदेव मेश्राम यांची धारदार शस्त्राने हत्या. अज्ञात आरोपींचा शोध सुरू; पोलिसांकडून तपासाला वेग.

Sep 23, 2026