Jalinder Kamte

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामटे यांचे निधन

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे जालिंदर कामटे यांचे आज दुःखद निधन झाले.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामटे यांचे निधन

Jalinder Kamte

पुणे (Jalinder Kamte) : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे जालिंदर कामटे यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी जेवणानंतर ते आपल्या खोलीत विश्रांतीसाठी गेले होते. दररोजप्रमाणे सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी न उठल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर सकाळी सुमारे नऊच्या सुमारास दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सायंकाळी अंत्यसंस्कार

जालिंदर कामटे यांच्यावर आज सायंकाळी कोंडवा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवेली तालुक्यातील कोंढवा हे त्यांचे मूळ गाव होते.

राजकीय आणि सामाजिक कारकीर्द

जालिंदर कामटे यांनी १९९९ ते २००२ या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. विद्यार्थी चळवळीतून त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली आणि पुढे युवक काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची संपूर्ण पुणे जिल्ह्यात ओळख होती. पुणे शहरातील विविध विद्यार्थी आंदोलनांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील अनेक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026