काँग्रेस युवा मोर्चा

केंद्रीय मंत्री श्री,अमित शाह यांच्याविरोधात काढलेल्या काँग्रेसच्या मोर्चाला कोरची युवा मोर्चाचे चोख प्रत्युत्तर

Congress Yuva Morcha: कोरची तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) ने काँग्रेसच्या वनवासी शब्दाविरोधात तीव्र प्रतिउत्तर दिला. युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी ने आरोप केले की काँग्रेस राजकीय

केंद्रीय मंत्री श्री,अमित शाह यांच्याविरोधात काढलेल्या काँग्रेसच्या मोर्चाला कोरची युवा मोर्चाचे चोख प्रत्युत्तर

Congress Yuva Morcha

कोरची (Congress Yuva Morcha) : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी 'वनवासी' शब्दाचा वापर केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने कुरखेडा येथे नुकताच एक तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला व काँग्रेसच्या भूमिकेला कोरची तालुक्याचे भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी यांनी कडाडून विरोध केला असून काँग्रेसवर दुटूपणाचा आरोप करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसचा कांगावा: विनोद कोरेटी 

यावेळी बोलताना युवा मोर्चा (Congress Yuva Morcha) तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी म्हणाले की, "वनवासी या शब्दाचा अर्थ जंगलात राहणारे असा होतो. काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक आदिवासी समाजाची दिशाभूल करत असून, राजकीय स्वार्थासाठी या मुद्द्यावरून अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाचा खरा विकास आणि सन्मान होत असून, काँग्रेस केवळ मतांच्या राजकारणासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहे."आदिवासी समाजाच्या सन्मानाचा मुद्दाभारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रतिउत्तरामध्ये, काँग्रेसने आदिवासीबहुल भागात केलेल्या कथित दुर्लक्षाची आठवण करून देण्यात आली.

केंद्रातील भाजप सरकारने नेहमीच आदिवासी संस्कृती आणि परंपरांचा यथोचित सन्मान केला आहे, असे सांगत कोरेटी यांनी काँग्रेसच्या या आंदोलनाला आदिवासी विरोधी मानसिकतेचे प्रदर्शन म्हटले आहे.स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभाग काँग्रेसच्या या आंदोलनाला शह देण्यासाठी कोरची व कुरखेडा परिसरातील भाजप आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, येत्या काळात काँग्रेसच्या या भूमिकेविरोधात स्थानिक पातळीवर जनजागृती करणार असल्याचे युवा मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

Sant Kabir Tribal Development Board: संत कबीर बहुउद्देशीय आदिवासी विकास मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ 27 सप्टेंबर 2026 रोजी जैन भवन, गांधीबाग नागपूर उत्साहात पार

Oct 01, 2026
अमित शहांची प्रकृती अस्वस्थ; दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा रद्द

अमित शहांची प्रकृती अस्वस्थ; दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा रद्द

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा १९-२० सप्टेंबरचा कोल्हापूर दौरा प्रकृती अस्वस्थ झाल्याने रद्द करण्यात आला. हुपरीतील ६०० कोटींच्या ग्रीन एनर्जी प्रकल्पाचे भूमिपूजन नियोजित होते.

Sep 19, 2026
एकनाथ शिंदेंच्या गुजराती भाषणावर संजय राऊतांचा निशाणा; ‘गुजराती नेत्यांना खूश करण्यासाठी बोलले असतील’

एकनाथ शिंदेंच्या गुजराती भाषणावर संजय राऊतांचा निशाणा; ‘गुजराती नेत्यांना खूश करण्यासाठी बोलले असतील’

वडनगरमधील एकनाथ शिंदेंच्या गुजराती भाषणावर संजय राऊतांची टीका; TMC चिन्ह प्रकरण आणि शिवसेना सुनावणीवरूनही निवडणूक आयोगावर आरोप.

Sep 18, 2026
‘आज आ धरती ऊपर आवीने गर्व अनुभवूं छूं’; शिंदेंनी गुजराती भाषेतून मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘आज आ धरती ऊपर आवीने गर्व अनुभवूं छूं’; शिंदेंनी गुजराती भाषेतून मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मोदींच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त वडनगरमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’. एकनाथ शिंदेंनी गुजराती भाषेतून भाषणाची सुरुवात करत मोदींच्या कार्याचा उल्लेख केला.

Sep 17, 2026
अमित शाहांच्या हिंदी वक्तव्यावर फडणवीसांचा विरोधकांना टोला; म्हणाले, ‘पूर्ण भाषण ऐकलं असतं तर...’

अमित शाहांच्या हिंदी वक्तव्यावर फडणवीसांचा विरोधकांना टोला; म्हणाले, ‘पूर्ण भाषण ऐकलं असतं तर...’

अमित शाहांच्या हिंदी वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार. जरांगे आंदोलन आणि दिशा सालियन प्रकरणावरही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया.

Sep 15, 2026