इंधन दरवाढ आंदोलन

इंधन दरवाढ विरोधात आयटीआय कॉर्नर ते पेट्रोल पंप परिसरात काँग्रेसचे जोरदार निषेध आंदोलन

Fuel Price Hike Andolan: मागील पंधरा दिवसात पेट्रोल डिजेलच्या किंमत मध्ये जवळपास आठ ते दहा रुपयांची दरवाढ झाली असून इंधन टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याच्या निषेधार्थ

इंधन दरवाढ विरोधात आयटीआय कॉर्नर ते पेट्रोल पंप परिसरात काँग्रेसचे जोरदार निषेध आंदोलन

Fuel Price Hike Andolan

 

नवनिर्वाचित अध्यक्षांच्या नेतृत्वाने कार्यकर्तांमध्ये नवचैतन्य

नांदेड (Fuel Price Hike Andolan) : मागील पंधरा दिवसात पेट्रोल डिजेलच्या किंमत मध्ये जवळपास आठ ते दहा रुपयांची दरवाढ झाली असून इंधन टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांच्या नेतृत्वात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक आयटीआय ते नजिकच्या पेट्रोल पंप परिसरात शुक्रवार (ता. २९) रोजी जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष यांच्या नेतृत्वातील पहिल्याच आंदोलनात कार्यकर्त्यांमध्ये मोठे नवचैतन्य दिसून आले.

पेट्रोल डिजेल दरवाढीच्या निषेधार्थ प्रारंभी आयटीआय चौकात केंद्र सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी (Fuel Price Hike Andolan) करण्यात आली. दरम्यान महिलांनी चुलीवर भाकरी थापून गॅस टंचाई विरोधात रस्त्यावर प्रतिकात्मक आंदोलन केले. बैलगाडीवर दुचाकी ठेवून नजिकच्या पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी जाऊन आंदोलन केले यादरम्यान पंपावर मेलीडी चॉकलेट वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफार, माजी आ. इश्वरराव भोसिकर,  सुरेशदादा गायकवाड, सुरेंद्र घोडसकर, एकनाथ मोरे, डॉ. रेखाताई चव्हाण, तिरुपती कोंडेकर, बालाजी गाढे, मुन्ना अब्बास, भगवान मनुरकर, श्रीनिवास मोरे, शिवाजी पाटील पाचपिंपलीकर, सत्यपाल सावंत, सुरेश हटकर, आनंद कल्याणकर, चांदोजी सूर्यवंशी, अनिल कदम,  कुमार कुर्तडीकर, गणेश ढगे, अतुल पेदेवाड, शंकर शिंदे, जसपालसिंग तबेलेवाले, सरदार बीटूसिंग, रामराम पाटील, संजय वाघमारे, बापूसाहेब पाटील, मधुकर सोनटक्के, मुकेश पटणे,  तोलबाजी जानकवाडे, सुरज पाटील शिंदे, दीपकसिंग हुजुरीया, गगन यादव, आंबादास रातोळे, निरंजन पावडे, रियाज शेख, विजय सोंडारे, सत्यजित बिराजदार, विलास पावडे, नसीम पठाण, ललिता कुंभार, ज्योती कदम, सुरेखा वैद्य, शितल जोंधळे, सोनु पाटील, शामराव मनाठकर, मुरलीधर कल्याणकर, गंगाधर आडेराव, कलीम शेख, नईम शेख, रिजवान पटेल, गौतम शिरसाट, नागराज सुलगेकर, रमेश चित्ते, शिवसंभो स्वामी, ज्ञानेश्वर राजेगोरे, मधुकर दिघे, माणिक चव्हाण,  गोविंद पाटील, प्रकाश दिपके, एस पी कुंभारे, गणेश कोकाटे, विष्णू पावडे, नईम शेख, अझर शेख, सचिन कानोडे, धनंजय उमरीकर, सय्यद वासे, अझर शेख आदीसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या बारा वर्षात केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर व उत्पादन शुल्काच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून ४३ लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. ही नफेखोरी जनतेच्या खिशावर दरोडा टाकून केली आहे. त्यामुळे आता कर व उत्पादन शुल्क कमी करुन दरवाढ आटोक्यात आणावी अशी मागणी उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांनी केली.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
काँग्रेसच्या निषेधार्थ उद्या भाजपाचे आंदोलन; शहर जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषदेत घोषणा

काँग्रेसच्या निषेधार्थ उद्या भाजपाचे आंदोलन; शहर जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषदेत घोषणा

Latur BJP Protest: लातूर शहराचे आमदार आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यासाठी उद्या गुरुवारी लातूर शहरात भाजपाने आंदोलनाचा एल्गार पुकारला. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील

Aug 05, 2026
हिंगोलीत काँग्रेस विरोधात भाजपाचे गांधी चौकात तीव्र आंदोलन; राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारून निषेध

हिंगोलीत काँग्रेस विरोधात भाजपाचे गांधी चौकात तीव्र आंदोलन; राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारून निषेध

Hingoli BJP Protest: काँग्रेस पक्षाकडून नवी दिल्ली येथे थेट पंतप्रधानांच्या निवासस्थाना समोर आंदोलन करून सुरक्षा धोक्यात आणल्याच्या निषेधार्थ 22 जुलै रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने

Jul 22, 2026
केंद्रीय मंत्री श्री,अमित शाह यांच्याविरोधात काढलेल्या काँग्रेसच्या मोर्चाला कोरची युवा मोर्चाचे चोख प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री श्री,अमित शाह यांच्याविरोधात काढलेल्या काँग्रेसच्या मोर्चाला कोरची युवा मोर्चाचे चोख प्रत्युत्तर

Congress Yuva Morcha: कोरची तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) ने काँग्रेसच्या वनवासी शब्दाविरोधात तीव्र प्रतिउत्तर दिला. युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी ने आरोप केले की काँग्रेस राजकीय

Jun 09, 2026
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात उद्धव ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात उद्धव ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढ, इंधन टंचाई आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व युवासेनेच्या वतीने चिखली येथे आंदोलन करण्यात आले.

May 28, 2026