अवैध वाळू वाहतूक

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाकडून जप्त

Illegal sand transportation: सहाय्यक जिल्हाधिकारी, यांच्या आदेशाने व तहसीलदार, माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय माहूरच्या गौण खनिज पथकाने दि. १० सप्टेंबर च्या मध्यरात्री अवैध रेती वाहतुक

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाकडून जप्त

Illegal sand transportation

 

माहूर तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाची मध्यरात्री धडक कारवाई

माहूर/ नांदेड (Illegal sand transportation) : सहाय्यक जिल्हाधिकारी, यांच्या आदेशाने व तहसीलदार, माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय माहूरच्या गौण खनिज पथकाने दि. १० सप्टेंबर च्या मध्यरात्री अवैध रेती वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत अवैध रेती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.

दि.१०  रोजी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास गौण खनिज पथक कर्तारसिंग तांडा परिसरात गस्त घालत असताना धानोरा येथून अवैध रेती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर येताना पथकाच्या निदर्शनास आले. (Illegal sand transportation) पथकाने सदर ट्रॅक्टरचा पाठलाग केला असता, चालकाने कर्तारसिंग तांडा परिसरात पथकासमक्ष धावत्या ट्रॅक्टरमधील अंदाजे एक ब्रास रेती खाली करून ट्रॅक्टरसह धानोरा येथील शेतरस्त्याने पळ काढला पथकाने पाठलाग सुरू ठेवत पैनगंगा नदीपात्राजवळ ट्रॅक्टरला पकडले.

मात्र, नदीपात्रातील चिखलात ट्रॅक्टर पूर्णपणे फसल्याने ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानेही प्रयत्न करून देखील ट्रॅक्टर बाहेर काढणे शक्य झाले नाही अखेर सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सदर मुद्देमालाचा  पंचनामा करण्यात आला. त्यानंतर जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर पोलिस पाटील, मोहपूर प्रदीप सोनटक्के यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कार्यवाही तहसीलदार अभिजित जगताप यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख नायब तहसीलदार कैलास जेठे, ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर पेंटेवाड, सुनील वणवे, कोतवाल बंडू चिरंगे, संतोष डाके, विलास शेळके, जनार्दन आढाव, चालक विलास शेडमाके यांनी केली

संबंधित सामग्री

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात; ७.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात; ७.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal sand transportation: तालुक्यातील इंद्राळ येथे विनापरवाना वाळू उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर देवणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर व ट्रॉलीतील अंदाजे एक ब्रास वाळू

Sep 28, 2026
पुरजळ गावाजवळ अवैध वाळू वाहतुकीवर महसूल पथकाची कारवाई

पुरजळ गावाजवळ अवैध वाळू वाहतुकीवर महसूल पथकाची कारवाई

Illegal sand transportation: ट्रॅक्टर वाहनासह वाळू असा सहा लाख 5 हजार 250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत एकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Sep 04, 2026
अवैध वाळू वाहतुकीचे टिप्पर पकडले; दहा लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त 

अवैध वाळू वाहतुकीचे टिप्पर पकडले; दहा लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त 

Illegal sand transportation: औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर काळे पेट्रोल पंपाजवळ पोलिसाच्या पथकाने कारवाई करून टिप्पर वाहनासह मुद्देमाल जप्त करून चालक-मालक यांच्यावर गुन्हा दाखल

Sep 04, 2026
जिल्हा सीमेवर अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा एलसीबीच्या ताब्यात; 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

जिल्हा सीमेवर अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा एलसीबीच्या ताब्यात; 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड–हिंगोली जिल्हा सीमेवरील वरूड तांडा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिस पथकाने कारवाई केली.

Jul 11, 2026
परभणीत पहाटे अवैध वाळू वाहतुकीवर धाड, तर घरझडतीत प्रतिबंधित गुटखा जप्त!

परभणीत पहाटे अवैध वाळू वाहतुकीवर धाड, तर घरझडतीत प्रतिबंधित गुटखा जप्त!

Parbhani illegal sand: परभणीतील पाथरी येथे पोलीसांनी अवैध वाळू वाहतुकीवर व गुटखा जप्तीवर धाडीची कारवाई केली. टिप्पर जप्त व दुसऱ्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा जप्त केला.

May 09, 2026