परभणीत झोला गोदावरी नदी पात्रात दोन तराफे नष्ट

झोला शिवारातील गोदावरी नदी पात्रातून तराफे आणि सक्शन पंपाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.

परभणीत झोला गोदावरी नदी पात्रात दोन तराफे नष्ट

Illegal Sand Mining

स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस व महसूल पथकाची संयुक्त कारवाई

परभणी : गंगाखेड तालुक्यातील झोला शिवारातील गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर शनिवार (दि. २३ मे) रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गंगाखेड पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन तराफे आणि एक सक्शन पंप जाळून नष्ट करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, झोला शिवारातील गोदावरी नदी पात्रातून तराफे आणि सक्शन पंपाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस हवालदार माणिक वाघ, राहुल परसोडे, महेश कवठाळे, पोलीस शिपाई दिलीप निलपत्रेवार, शरद सावंत, चालक मो. इम्रान तसेच गंगाखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगणवाड यांच्या पथकाने महसूल विभागासोबत संयुक्त कारवाई केली.

महसूल विभागाच्या पथकात नायब तहसीलदार मो. आजीम, मंडळ अधिकारी शंकरराव राठोड आणि तलाठी शंकरराव गोरे यांचा समावेश होता.

शनिवार दुपारी सुमारे २:३० ते ३:३० वाजेदरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत गोदावरी नदी पात्रात आढळून आलेले दोन तराफे आणि एक सक्शन पंप जाळून नष्ट करण्यात आले.

यंत्राच्या सहाय्याने होणारा वाळू उपसा केव्हा थांबणार?

गंगाखेड तालुक्यातील मुळी, धारखेड, चिंचटाकळी, महातपुरी, आनंदवाडी, गौडगाव, झोला, मसला आणि नागठाणा या गोदावरी नदीकाठच्या गावांलगत असलेल्या वाळू घाटांचा लिलाव करण्यात आलेला आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.

गोदावरी नदी पात्रातून सुरू असलेला अवैध वाळू उपसा नेमका केव्हा थांबणार, असा सवाल गंगाखेड शहरासह तालुक्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026