गुप्तधनासाठी बेकायदेशीर खोदकाम; पाच ते सहा जण पोलिसांच्या ताब्यात

जुन्या वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरात शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण पथकाने सायंकाळी सहा वाजता अचानक कारवाई करत पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले.

गुप्तधनासाठी बेकायदेशीर खोदकाम; पाच ते सहा जण पोलिसांच्या ताब्यात

Illegal Digging​​​​​​​

शहरातील काही प्रतिष्ठितांचा हात असल्याची चर्चा

वाशिम (Illegal Digging) : जुन्या वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरात शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण पथकाने सायंकाळी सहा वाजता अचानक कारवाई करत पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले. गुप्तधनासाठी बेकायदेशीरपणे खोदकाम करण्यात येत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याची शहरात जोरदार चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बंद असलेल्या रमेश टॉकीज परिसरात काही दिवसांपासून गुप्तधनाच्या शोधासाठी खोदकाम सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक धाड टाकली.

या कारवाईदरम्यान पाच ते सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींचा देखील सहभाग असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, या संदर्भात पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू होती.

या कारवाईमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले असून, पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026