अन्न व औषध प्रशासन विभाग

औंढ्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची पेढे विक्रेत्यांवर धडक कारवाई

Food and Drug Department: अन्न व औषध प्रशासनाचा मिठाई विक्रेत्यांवर धडक तपासणी करून साठलेल्या अनन्याचा विश्लेषण करण्यात आला. 93 किलोचे नष्ट करण्यात आले आहेत.

औंढ्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची पेढे विक्रेत्यांवर धडक कारवाई

Food and Drug Department

 

खव्याचे सात नमुने तपासणीसाठी, 93 किलो साठा नष्ट

हिंगोली (Food and Drug Department) : अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत आज हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. याबाबत विविध प्राप्त तक्रारींच्या आधारे 10 मिठाई विक्रेते आस्थापनांची या कारवाई दरम्यान तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार विविध बाबींची पडताळणी करण्यात आली.

या तपासणी मोहिमेत अन्न नोंदणी अथवा वैध परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, निकृष्ट दर्जाच्या खव्याचे सात नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून, चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवण्यात आलेला 93 किलोचा साठा नष्ट करण्यात आला असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

औंढा नागनाथ येथील (Food and Drug Department) अन्न व्यावसायिक हे वसमत येथील व्यावसायिकांकडून खवा खरेदी करून विक्री करत असल्याचे या तपासणीत निदर्शनास आले. त्यानुषंगाने वसमत येथेही विशेष पथक पाठवून पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ही कारवाई (Food and Drug Department) अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे, श्रीमती सावंत, वैभव ठोंबरे, कृष्णा मुळे यांनी सहायक आयुक्त श्री. खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थांची खरेदी करण्याचे तसेच कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाला त्वरित कळविण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभाग, छत्रपती संभाजीनगरचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी केले आहे. 

संबंधित सामग्री

औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

Aundha Nagnath Temple closed: औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिराच्या परिसरातील आतील गर्भगृहातील दुरुस्तीचे काम सहायक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Oct 02, 2026
श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; दर्शनासाठी सहा ते सात तास रांगा

श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; दर्शनासाठी सहा ते सात तास रांगा

हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने शनिवार, रविवार तसेच श्रावण सोमवारी श्री नागनाथाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होत आहे.

Aug 22, 2026
तब्बल दीड लाखाहुन अधिक भाविकांनी घेतले श्री क्षेत्र औंढा नागनाथाचे दर्शन

तब्बल दीड लाखाहुन अधिक भाविकांनी घेतले श्री क्षेत्र औंढा नागनाथाचे दर्शन

Shri Aundha Nagnath: आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे श्रावणातील पहिल्या सोमवारी व त्यातच आलेल्या नागपंचमी निमित्त हर हर महादेव बम बम भोले च्या जय घोषात दीड लाखावर भाविकांनी दर्शन

Aug 17, 2026
पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी घेतले औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन 

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी घेतले औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन 

SP Shrenik Lodha: येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे हिंगोलीचे नूतन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी पूजा अभिषेक करत दर्शन घेतले व हेमाडपंथी मंदिराची पहाणी

Jul 14, 2026
पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा आरोग्य विभाग सज्ज

पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा आरोग्य विभाग सज्ज

Hingoli Health Department: हिंगोली जिल्हा आरोग्य विभागाने शेगावच्या पालखीमार्गावर वेळेच्या मायक्रोप्लान तयार केलेली आहे. दिंड्यांना वैद्यकीय सहाय्य, औषध साठा, पिण्याचा पाण्याचा परीक्षण

Jun 29, 2026