हिंगोली गाय चोरी

हिंगोलीत एका गायसह दोन कारवडची चोरी; एका गायीचा मृत्यू

Hingoli Cow Theft: हिंगोली शहरातील यशवंत नगरमध्ये अज्ञात चोरट्याने एका गायीसह दोन कारवड चोरून नेल्या. एका गायीला खाऊ घातल्याने तिचा मृत्यू झाला आणि पोलीस गुन्हा दाखल केला.

हिंगोलीत एका गायसह दोन कारवडची चोरी; एका गायीचा मृत्यू

Hingoli Cow Theft

हिंगोली () : शहरातील यशवंत नगर भागामध्ये अज्ञात चोरट्याने एका गायीसह दोन कारवड चोरून नेल्या. तर यामध्ये (Hingoli Cow Theft) एका गायीचा मृत्यू झाल्याने हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील यशवंत नगर भागातून गायीसह कारवड चोरून (Hingoli Cow Theft) नेल्याची घटना ९ एप्रिलला घडली. ज्यामध्ये सुनिल मदनलाल साहू यांची ६ हजार रुपयाची पांढर्‍या रंगाची गाय, अनिल मदनलाल साहू यांची ६ हजार ५०० रुपयाची पांढर्‍या रंगाची कारवड व विशाल मदनलाल यादव यांची ६ हजार ५०० रुपयाच्या दोन कारवडी अशा एकुण १९ हजाराची गाय व तीन कारवड अज्ञात चोरट्याने चोरून नेले. तसेच एका ६ हजार रुपयाच्या गायीला काहीतरी खाऊ घातल्याने तिचा मृत्यू झाल्याने हिंगोली शहर पोलिसात तुळजाराम साहू यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026