कार अपघाती मृत्यू

दुभाजकावर कार आदळून दोघांचा जागीच मृत्यू

Car Accidental Death: हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर कळमनुरीजवळ १६ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात भरधाव कार डिव्हायडरला धडकल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी

दुभाजकावर कार आदळून दोघांचा जागीच मृत्यू

Car Accidental Death


हिंगोली-नांदेड मुख्य रस्त्यावर कळमनुरी जवळील अपघात

हिंगोली/ कळमनुरी (Car Accidental Death) : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर कळमनुरीजवळ १६ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात भरधाव कार डिव्हायडरला धडकल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच-४३-एएल-३२५३ क्रमांकाची कार हिंगोलीहून पुसदकडे जात असताना कळमनुरीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट डिव्हायडरवर आदळली. अपघात इतका भीषण होता की कारचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात परिमल राठोड (२४) व उदय गाजरे (१८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल कागणे (२४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जमीर नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे, जमादार दिलीप फुले, रामा शेळके व इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी परिमल राठोड व उदय गाजरे यांना तपासून मृत घोषित केले, तर जखमी अमोल कागणे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान १७ जुलै शुक्रवार रोजी हिंगोलीतील शासकीय महाविद्यालय व रूग्णालयात मयत परीमल राठोड व उदय गाजरे या दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या (Car Accidental Death) प्रकरणी वृत्त लिहिपर्यंत कळमनुरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद अथवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती जमादार दिलीप पोले यांनी दिली. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

दोघेही जीम मधील प्रशिक्षक
हिंगोली शहरातील एनटीसी भागातील फिट अ‍ॅन्ड बोल्ड या जीममध्ये प्रशिक्षक म्हणुन परीमल राठोड व उदय गाजरे हे होते. दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

महंमदवाडीत भरधाव डंपरच्या धडकेत २० वर्षीय IT इंजिनिअर हमजा इब्राहिम सरकारचा मृत्यू झाला. एक तरुण गंभीर जखमी असून डंपर चालकाला अटक करण्यात आली.

Sep 23, 2026
सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळ कार-कंटेनर अपघातात कर्ण पवार यांचा मृत्यू; अनिकेत धोत्रे आणि रोहित मोरे गंभीर जखमी.

Sep 22, 2026