पोलिस अधिक्षक डॉ. लोढा

जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही: पोलिस अधिक्षक डॉ. लोढा

SP Dr. Lodha: हिंगोलीत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी गुरूवारी पहिला ‘गुन्ह्यांचा आढावा’ मॅरेथॉन बैठक घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे खपवणीवर नियंत्रण

जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही: पोलिस अधिक्षक डॉ. लोढा

SP Dr. Lodha

 

नूतन पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत पहिली मॅरेथॉन गुन्हे आढावा बैठक

हिंगोली (SP Dr. Lodha) : जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या उपस्थितीत गुरूवारी पहिली गुन्हे आढावा मॅरेथॉन बैठक पार पडली. बैठकीमध्ये जिल्ह्यामध्ये कुठेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. ज्या ठिकाणी अवैध धंदे आढळून आल्यास त्यावर पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल असा इशारा पोलिस अधिक्षक डॉ. लोढा यांनी दिला.

१३ ऑगस्ट गुरूवार रोजी जिल्ह्यातील १३ ही पोलिस ठाण्यासह विविध शाखेतील पोलिस अधिकार्‍यांची गुन्हे आढावा बैठक जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा (SP Dr. Lodha) यांनी घेतली. ही मॅरेथॉन बैठक जवळपास सायंकाळी ५.३० पर्यंत चालली. बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेऊन प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. सध्या श्रावणमास प्रारंभ झाला आहे. त्या निमित्ताने सर्व पोलिस ठाणे हद्दिमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यामध्ये कुठेही अवैध धंदे चालता कामा नये, ज्या ठिकाणी अवैध धंदे आढळून आल्यास त्यावर पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल. सर्वांनी आपआपल्या कामामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्यासह गृह पोलिस उपाधिक्षक हरीष गवळी वसमत उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, हिंगोली शहर उपविभागीय अधिकारी नारायण देशमुख, हिंगोली ग्रामीण उपविभागीय अधिकारी सतिष वाघ यांच्यासह विविध शाखेचे आणि पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सहा वर्षांनी गुन्हा दाखल; अत्याचार, हत्या आणि कटाचा ठपका

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सहा वर्षांनी गुन्हा दाखल; अत्याचार, हत्या आणि कटाचा ठपका

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सहा वर्षांनी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हत्या, सामूहिक अत्याचार, कट आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांखाली विविध कलमे लावण्यात आली आहेत.

Sep 14, 2026
अवैध धंद्यावरील कारवाईत पोलीस ठाण्यांची धडाकेबाज कारवाई, पण एलसीबीला मात्र 'ठावठिकाणा' लागेना  

अवैध धंद्यावरील कारवाईत पोलीस ठाण्यांची धडाकेबाज कारवाई, पण एलसीबीला मात्र 'ठावठिकाणा' लागेना  

Illegal business Action: जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांनी अवैध धंद्यांविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारल्यामुळे जिल्ह्यातील अवैध दारू, मटका, वाळू तस्करी आणि जुगारावर कारवाईचा धडाका सुरू

Aug 20, 2026
ऑफिस की अत्याचाराचं अड्डा? नाशिकच्या आयटी कंपनीत धक्कादायक कृत्य!

ऑफिस की अत्याचाराचं अड्डा? नाशिकच्या आयटी कंपनीत धक्कादायक कृत्य!

शहरातील एका आघाडीच्या आयटी कंपनीत घडलेल्या गंभीर कार्यस्थळी छळ प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.

Apr 09, 2026