शुभम भवरचे GPAT परीक्षेत घवघवीत यश

​शुभमने मिळवलेल्या यशामुळे तो आता औषधनिर्माण शास्त्र (Pharmacy) मधील उच्च शिक्षणासाठी पात्र ठरला आहे.

शुभम भवरचे GPAT परीक्षेत घवघवीत यश

GPAT 2026 Success

​नांदेड (GPAT 2026 Success) : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS), नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या GPAT 2026 परीक्षेत हदगाव तालुक्यातील धानोरा (आडा) येथील सुपुत्र चि. शुभम विष्णू भवर याने घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाने त्याने केवळ आपल्या गावाचेच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.

​शुभमने मिळवलेल्या या यशामुळे तो आता औषधनिर्माण शास्त्र (Pharmacy) मधील उच्च शिक्षणासाठी पात्र ठरला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेत यश मिळवणे हे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते, मात्र शुभमने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे साध्य करून दाखवले.

​आपल्या या अभूतपूर्व यशाबद्दल बोलताना शुभमने याचे श्रेय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एम. डी. किटूकले, प्रा. आर. डी. वानोले, तसेच आपले आजी-आजोबा दत्तराव भवर व सौ. शांताबाई भवर आणि आई-वडील विष्णू भवर व सौ. सुनंदा भवर यांना दिले आहे.

शुभमच्या या यशाबद्दल डॉ. प्रियंका ठाकरे, डॉ. गजानन कनवाळे, फार्मासिस्ट शिवदास शिंदे, संकेत शिंदे, राहुल शिंदे, तुकाराम कवाने, अविनाश व सौ. अनघा मईन्ग, संतोष व सौ. पूजा सूर्यवंशी, सोपानराव व सौ. सुमन काळे, नामदेव व सौ. कोमल सूर्यवंशी तसेच संपूर्ण भवर परिवाराने त्याचे अभिनंदन केले आहे. शुभमच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

मराठवाड्यात पावसाची तूट असताना नांदेडमध्ये दुष्काळ आढावा बैठक झाली. बैठकीतील काजू-बदामाच्या नाश्त्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर टीका सुरू झाली.

Sep 19, 2026
वेलनेस स्पाच्या आड वेश्याव्यवसाय; नांदेडमध्ये LCBची मोठी कारवाई; तिघांना अटक

वेलनेस स्पाच्या आड वेश्याव्यवसाय; नांदेडमध्ये LCBची मोठी कारवाई; तिघांना अटक

नांदेड शहरातील फुले मार्केट परिसरात वेलनेस स्पा सेंटरच्या आड सुरू असल्याचा आरोप असलेल्या वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

Sep 05, 2026
नांदेडमध्ये १० वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा आरोप; ५० वर्षीय मुख्याध्यापकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेडमध्ये १० वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा आरोप; ५० वर्षीय मुख्याध्यापकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड शहरातील श्रीनगर परिसरातील एका शाळेत १० वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

Aug 21, 2026