Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

Nanded School Case

नांदेडमध्ये १० वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा आरोप; ५० वर्षीय मुख्याध्यापकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड शहरातील श्रीनगर परिसरातील एका शाळेत १० वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.


नांदेडमध्ये १० वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा आरोप ५० वर्षीय मुख्याध्यापकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Nanded School Case |

श्रीनगर परिसरातील शाळेतील धक्कादायक प्रकार; भाग्यनगर पोलिसांकडून POCSO आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

नांदेड शहरातील श्रीनगर परिसरातील एका शाळेत १० वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात त्याच शाळेतील ५० वर्षीय मुख्याध्यापक संशयाच्या भोवऱ्यात असून, भाग्यनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत असताना संबंधित मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. मुलीने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

मुलीकडून माहिती मिळताच पालकांनी तातडीने भाग्यनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी काल रात्री ५० वर्षीय संशयित मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात अल्पवयीन मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी असलेल्या POCSO कायद्यासह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

तपासादरम्यान मुलीचा जबाब तसेच उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणाचा तपास भाग्यनगर पोलीस करत आहेत. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनेला दुजोरा देत तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. संबंधित प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

Related to this topic: