शासकीय जमिनीवरील जुनी निवासी अतिक्रमणे होणार नियमित; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 शासकीय जमिनीवर १ जानेवारी २०११ पूर्वीपासून निवासी वापरासाठी सलग वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

शासकीय जमिनीवरील जुनी निवासी अतिक्रमणे होणार नियमित; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Government Land Regularization

पातूर (Government Land Regularization) : शासकीय जमिनीवर १ जानेवारी २०११ पूर्वीपासून निवासी वापरासाठी सलग वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. या जुन्या निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्याची अधिकृत प्रक्रिया पातूरच्या तहसीलदार कार्यालयाकडून सुरू करण्यात आली असून, पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत केवळ ५०० चौरस फुटांपर्यंतच्या क्षेत्राचे नियमन करण्यात येणार असून, त्यापेक्षा जास्त क्षेत्र असल्यास अतिरिक्त भागावर नियमानुसार कारवाई केली जाईल. नियमित झालेली ही जमीन केवळ निवासासाठीच वापरता येईल; तिची व्यावसायिक विक्री किंवा हस्तांतरण करण्यास कायद्याने सक्त मनाई असेल. तसेच वनक्षेत्र, सार्वजनिक उपयोगाच्या जागा, रस्ते, नाले, गायरान किंवा इतर शासकीय आरक्षणाखालील भूखंडांवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमित केली जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पात्रतेसाठी अर्जदाराने १ जानेवारी २०११ पूर्वीपासून त्याच ठिकाणी वास्तव्यास असल्याचा अधिकृत पुरावा, ओळखपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची कर पावती किंवा जुने महसूल दस्तऐवज जोडून ३१ डिसेंबर २०२६ पूर्वी तहसीलदार कार्यालय, पातूर येथे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून अनिश्चिततेच्या छायेत राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना हक्काचा कायदेशीर आधार मिळणार आहे.

संबंधित सामग्री

मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Transgender Education Scholarship: तृतीयपंथीयांना शिष्यवृत्ती तसेच स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृ‍तिक ‍विकास घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार

Sep 10, 2026
डायलिसिस रुग्णांना १०० टक्के एसटी प्रवास सवलत द्या; भाजप पदाधिकाऱ्यांचे मलकापूर आगार प्रमुखांना निवेदन

डायलिसिस रुग्णांना १०० टक्के एसटी प्रवास सवलत द्या; भाजप पदाधिकाऱ्यांचे मलकापूर आगार प्रमुखांना निवेदन

डायलिसिससारख्या गंभीर आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना नियमितपणे रुग्णालयात जावे लागते.

Aug 11, 2026
लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का: 80 लाख महिला अपात्र; पात्रांवर अन्याय नाही – फडणवीसांचे स्पष्टीकरण

लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का: 80 लाख महिला अपात्र; पात्रांवर अन्याय नाही – फडणवीसांचे स्पष्टीकरण

राज्यातील चर्चेत असलेल्या *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने*मध्ये मोठी घडामोड समोर आली आहे.

Jun 02, 2026