कोरेगाव ग्रा.पं. पोटनिवडणुकीत पाच सदस्य बिनविरोध

दसाईगंज तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या वर्षी २१ फेब्रुवारी रोजी मोठे राजकीय वादळ उठले होते.

कोरेगाव ग्रा.पं. पोटनिवडणुकीत पाच सदस्य बिनविरोध

Gadchiroli Politics

कोरेगाव (Gadchiroli Politics) : दसाईगंज तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या वर्षी २१ फेब्रुवारी रोजी मोठे राजकीय वादळ उठले होते. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गोंड-गोवारी समाज अनुसूचित जमातीत मोडत नसल्याचे स्पष्ट करत पाच सदस्यांना अपात्र ठरवण्याचा आदेश दिला होता.

दरम्यान, कोरेगाव येथील जयपेरसा आदिवासी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने संबंधित पाचही सदस्य अपात्र ठरल्याने ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या पोटनिवडणुकीत ममता मनोहर आळे, खुशाल वैद्यनाथ आळे, सुधाकर दामा मडावी, अर्चना मिनेश मरस्कोल्हे आणि सीमा योगेश्वर आळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, विहित कालावधीत त्यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने पाचही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे हा विषय सध्या चर्चेचा ठरला आहे.

तथापि, या निकालाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

संबंधित सामग्री

ग्रामपंचायत निवडणुकांना पुन्हा विलंबाची शक्यता; SIR मुळे निवडणूक कार्यक्रम लांबणीवर?

ग्रामपंचायत निवडणुकांना पुन्हा विलंबाची शक्यता; SIR मुळे निवडणूक कार्यक्रम लांबणीवर?

SIR प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबण्याची शक्यता; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी, तर जानेवारी २०२७ मध्ये निवडणुकीची शक्यता.

Sep 15, 2026
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता प्रशासकराज; विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता प्रशासकराज; विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

मुदत संपलेल्या व निवडणुका प्रलंबित ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले जाणार. विस्तार अधिकाऱ्यांकडे कारभार सोपवण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय.

Sep 09, 2026
पातूर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तयारी; १० सप्टेंबरला तहसील कार्यालयात प्रक्रिया

पातूर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तयारी; १० सप्टेंबरला तहसील कार्यालयात प्रक्रिया

Patur Gram Panchayat Election: अकोला जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदांच्या आरक्षण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, पातूर तालुक्यासाठी सरपंच पदाच्या आरक्षण

Sep 07, 2026
कोरची नगरपंचायतीत सत्ता उलथापालथ; बहुमत गमावल्याने राजकीय समीकरणे ढवळून निघाली

कोरची नगरपंचायतीत सत्ता उलथापालथ; बहुमत गमावल्याने राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Korchi Nagar Panchayat: तालुक्यातील कोरची नगरपंचायतीत सध्या मोठी राजकीय उलथापालथ झाली असून सत्ताधारी पक्षाचे बहुमत संपुष्टात आले आहे. 17 सदस्यसंख्या असलेल्या नगरपंचायतीत बहुमतासाठी 9 सदस्यांची गरज

Jul 25, 2026
निवडणूकीत आ.राजू नवघरे, राजामती मुटकुळे व अभय पाटील सावंत विजयी

निवडणूकीत आ.राजू नवघरे, राजामती मुटकुळे व अभय पाटील सावंत विजयी

Parbhani Bank Election: वसमत मधून आमदार राजूभैय्या नवघरे, हिंगोलीतून सौ. राजामती शिवाजीराव मुटकुळे आणि कळमनुरीतून अभय पाटील सावंत या तिन्ही उमेदवारांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला

Jul 20, 2026