गोरेगाव डिझेल-पेट्रोल टंचाई

गोरेगावात डिझेल-पेट्रोल टंचाईच्या निषेधार्थ पंतप्रधानांचा प्रतीकात्मक पुतळा दहन

Goregaon Diesel-Petrol Shortage: गोरेगाव येथे शेतकरी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळून आंदोलन छेडले. डिझेल-पेट्रोलच्या महागाई आणि टंचाईच्या कारणाने शेतकऱ्यांनी

गोरेगावात डिझेल-पेट्रोल टंचाईच्या निषेधार्थ पंतप्रधानांचा प्रतीकात्मक पुतळा दहन

Goregaon Diesel-Petrol Shortage

गोरेगाव (Goregaon Diesel-Petrol Shortage) : डिझेल- पेट्रोलच्या वाढत्या महागाई आणि निर्माण झालेल्या तीव्र टंचाईच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने 19 मे  रोजी गोरेगाव येथील चौफुली परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र आंदोलन छेडण्यात आले. शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. देशात डिझेल-पेट्रोलचे दर गगनाला भिडले असून त्यातच पंपावर तासन्तास रांगेत उभे राहूनही इंधन मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिक व शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. 

पेरणीपूर्व मशागत, फवारणी, तसेच शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी डिझेल अत्यावश्यक आहे. मात्र, पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे ठप्प झाली असून याचा थेट परिणाम खरीप हंगामावर होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यामुळे ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शासनाला तातडीचा इशारा दिला आहे. देश चालवणाऱ्यांनी तात्काळ ठोस उपाययोजना करून नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना सुरळीतपणे डिझेल-पेट्रोल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा येत्या काळात राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि मोठा जनआक्रोश उसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. (Goregaon Diesel-Petrol Shortage) आंदोलनादरम्यान शेतकरी व नागरिकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

Jio-BPच्या काही पंपांवर डिझेल खरेदी 50 लिटरपुरती मर्यादित; Nayara Energyवरही निर्बंध. सरकारी तेल कंपन्यांच्या पंपांवर मात्र सध्या विक्री सुरळीत.

Sep 24, 2026
ताकतोडा येथे शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन, बोगस खतांवर कारवाईची मागणी

ताकतोडा येथे शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन, बोगस खतांवर कारवाईची मागणी

Farmer Jal Samadhi Andolan: सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे शेतकऱ्यांनी विहिरीत उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन

Aug 19, 2026
लामजना येथे 24 ऑगस्टला शेतकरी संघटनांचे रास्ता रोको

लामजना येथे 24 ऑगस्टला शेतकरी संघटनांचे रास्ता रोको

Farmers Rasta Roko: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची बोळवण करत वाऱ्यावर सोडण्याचे कुटील कारस्थान सरकारचे असल्याने शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष आहे.

Aug 18, 2026
शक्तीपीठ महामार्गाला विरोध; संतप्त शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांना विचारला जाब

शक्तीपीठ महामार्गाला विरोध; संतप्त शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांना विचारला जाब

Shaktipeeth Expressway: जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गा करीता अनेक शेतकर्‍यांची शेती जाणार आहे. या शक्तीपीठ महामार्गाला संघर्ष समितीकडून विरोध होत आहे.

Aug 16, 2026