Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

शेतकरी जलसमाधी आंदोलन

ताकतोडा येथे शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन, बोगस खतांवर कारवाईची मागणी

Farmer Jal Samadhi Andolan: सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे शेतकऱ्यांनी विहिरीत उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन


ताकतोडा येथे शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन बोगस खतांवर कारवाईची मागणी

Farmer Jal Samadhi Andolan |

हिंगोली (Farmer Jal Samadhi Andolan) : सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे शेतकऱ्यांनी विहिरीत उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन केले. कृषी विभागाच्या कारभाराबत नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांनी यावेळी अनेक मागण्या मांडल्या.

सेनगाव तालुक्याचे कृषी अधिकारी यांनी कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. त्याचबरोबर जिल्ह्यातील बोगस खत आणि पेस्टिसाइड विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

रोजगार हमी योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजावरही शेतकऱ्यांनी (Farmer Jal Samadhi Andolan) आक्षेप घेतला. सेनगाव तालुक्यात कार्यरत असले काही कर्मचारी शासकीय कामाकडे दुर्लक्ष करून शेळ्या हाकण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी ताकतोडा येथील विहिरीत उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, तालुकाध्यक्ष प्रवीण मते, श्याम मते, अक्षय सावखे, चंद्रकांत सावके, निखिल शेवाळे, महेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनायक देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. कृषी विभागाचे जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी काळे यांनीही आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी, अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

Related to this topic: