शक्तिपीठ महामार्ग रद्द

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी जवळा बाजारात रास्ता रोको 

Shaktipeeth Highway Andolan: सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेल्या एका पुढार्‍याने अनेक वर्षे विरोधात घालवल्यामुळे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सरकार विरोधात भाषण केल्यामुळे उलट सुलट चर्चा रंगली

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी जवळा बाजारात रास्ता रोको 

Shaktipeeth Highway Andolan

जवळा बाजार (Shaktipeeth Highway Andolan) : औंढा व वसमत तालुक्यातून जाणारा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सोमवारी येथील बस स्टैंड वर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता. याप्रसंगी महामार्ग रद्द कृती समितीचे संदीप माटेगावकर, नरवाडे, नवनाथ कुऱ्हे, नंदू बाहेती यांच्यासहित अनेक जणांचे समयोचित भाषणे झाली. मात्र नुकताच सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेल्या एका पुढार्‍याने अनेक वर्षे विरोधात घालवल्यामुळे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सरकार विरोधात भाषण केल्यामुळे उलट सुलट चर्चा रंगली होती.

शक्तिपीठ महामार्गासाठी (Shaktipeeth Highway Andolan) संपादित करण्यात येणारी जमीन अत्यंत सुपीक असल्यामुळे सदर महामार्ग झाल्यास शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. तसेच एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामधून महामार्ग गेल्यास शेताच्या दोन्ही बाजूला जाण्यासाठी त्याला तीन किलोमीटरचा हेलपाटा पडण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे हजारो वृक्षतोड होणार असल्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर महामार्ग रद्द करावा असे निवेदन तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

महसूल विभागातर्फे निवडणूक विभागाचे नूतन नायब तहसीलदार काळे, तलाठी संगमेश्वर सोनटक्के यांनी निवेदन स्वीकारले. सहाय्यक  पोलीस निरीक्षक कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे व अमोल इंगोले, जमादार इमरान सिद्दिकी, राजू  ठाकूर व दिलीप नाईक यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

संबंधित सामग्री

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफीची रक्कम मिळूनही IOB एकलारा शाखेतील २८८ शेतकऱ्यांची खाती बंद नाहीत. नवीन पीक कर्जासाठी चार तास ठिय्या आंदोलनानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश.

Sep 26, 2026
शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

तावशीतील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तासन्‌तास उन्हात थांबले; भेट न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत करपलेल्या पिकांची होळी केली.

Sep 24, 2026
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषद; धान खरेदी, नुकसानभरपाई, महामार्ग व रोजगाराच्या मागण्या.

Sep 18, 2026
नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

धान बोनस, ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर आणि २४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात नागभीडमध्ये हजारो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा.

Sep 17, 2026
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यापूर्वी नामदेव पतंगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप; जिल्हाभर आंदोलनाचा इशारा.

Sep 16, 2026