शिक्षण विभाग फसवणूक

शिक्षण विभागाला बनावट कागदपत्रांनी गंडा?; शिक्षण उपसंचालकांनी नेमली त्रिसदस्यीय चौकशी समिती!

Education Department Fraud: स्वतःची नियुक्ती आणि वैयक्तिक मान्यतेसंदर्भात बनावट दस्ताऐवज व बोगस स्वाक्षऱ्यांचा वापर करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपावरून शिक्षण उपसंचालक

शिक्षण विभागाला बनावट कागदपत्रांनी गंडा?; शिक्षण उपसंचालकांनी नेमली त्रिसदस्यीय चौकशी समिती!

Education Department Fraud

लातूर (Education Department Fraud) : ​स्वतःची नियुक्ती आणि वैयक्तिक मान्यतेसंदर्भात बनावट दस्ताऐवज व बोगस स्वाक्षऱ्यांचा वापर करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपावरून शिक्षण उपसंचालकांनी तीन सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची ही विभागीय चौकशी निष्पक्ष न झाल्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा तक्रारकर्त्यांने दिला आहे.

निलंगा तालुक्यातील धानोरा येथील सत्याई शिक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या कै. राजाबाई धानोरकर विद्यालयातील कथित बनावट कागदपत्र प्रकरणाने संपूर्ण लातूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश माने यांनी स्वतःची नियुक्ती आणि वैयक्तिक मान्यतेसंदर्भात बनावट दस्ताऐवज व बोगस स्वाक्षऱ्यांचा वापर करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप ​तक्रारदार माधव रामराव पिटले यांनी २८ जून २०२६ रोजी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे केली होती. (Education Department Fraud) विशेष चौकशी पथकासमोर (एस आय टी) मूळ नियुक्ती आदेश आणि वैयक्तिक मान्यतेची अधिकृत कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते. मात्र, ती सादर न करता मुख्याध्यापकांनी कथितरित्या बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर खोट्या स्वाक्षऱ्या करत संपूर्ण शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.

इतकेच नव्हे तर ​आपले पद टिकवून ठेवण्यासाठी अधिकृत मूळ दस्तऐवज नसतानाही बनावट कागदपत्रांचा आधार घेण्यात आला. चौकशीत हा प्रकार सिद्ध झाल्यास तो केवळ प्रशासकीय नियमभंग नसून शासनाविरुद्ध केलेली थेट फसवणूक ठरेल, असा दावाही तक्रारदाराने केला आहे.

​दरम्यान, ​(Education Department Fraud) प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विभागीय शिक्षण उपसंचालकांनी ८ जुलै २०२६ रोजी अधिकृत आदेश काढून तीन सदस्यांची चौकशी समिती गठित केली आहे. तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली असून त्यात गटशिक्षणाधिकारी चंद्रहास म्हत्रे व शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर ढमाले यांचा समावेश आहे. दरम्यान शिक्षणाधिकारी क्षीरसागर यांची बदली झाल्याने या समितीचा अध्यक्ष कार्यभार कोणाकडे जातो, हेही तितकेच महत्त्वाचे.

संबंधित सामग्री

पेपरफुटीवर सरकारचा मोठा निर्णय; 10 वर्षांचा तुरुंगवास, ₹10 कोटी दंडाचे विधेयक

पेपरफुटीवर सरकारचा मोठा निर्णय; 10 वर्षांचा तुरुंगवास, ₹10 कोटी दंडाचे विधेयक

New Anti Paper Leak Bill 2026: सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक 2026, लोकसभेत सादर करण्यात आले आहे. जर या (Anti Paper Leak Bill) विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले पेपरफुटी..

Jul 27, 2026
रत्नागिरीत दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई; निशा कांबळे निलंबित, हर्षलता गेडाम यांची विभागीय चौकशी

रत्नागिरीत दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई; निशा कांबळे निलंबित, हर्षलता गेडाम यांची विभागीय चौकशी

शासकीय कामकाजातील अनियमितता आणि कर्तव्यातील निष्काळजीपणाच्या आरोपांवरून रत्नागिरीतील दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांविरोधात शासनाने प्रशासकीय कारवाई केली आहे.

Jul 11, 2026
प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणखी चार कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणखी चार कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

प्रादेशिक मनोरुग्णालयातील प्रशासकीय अव्यवस्था व अनियमितताप्रकरणी विभागीय चौकशी अहवालात आणखी चार कर्मचारी दोषी आढळल्याची माहिती उजेडात आली आहे.

Mar 26, 2026