खुलताबाद (Dr. Babasaheb Ambedkar) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची 135 वी जयंती खुलताबाद उत्सव समिती बैठक श्री. कारभारी दादा ढवळे, यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती सदस्य श्री. दिनेश भाऊ अंभोरे, श्री. महेंद्र घुसळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

खुलताबाद उत्सव समिती खालील प्रमाणे अध्यक्ष श्री. नितीन जाधव, सचिव श्री. शशिकांत घुसाळे, उपाध्यक्ष श्री. विकास घाटे, अमोल ढवळे, स्वप्नील लोखंडे, शुभम जाधव, अशी निवड करण्यात आली. या बैठकीला साईनाथ केदारे, अनिल घुसळे, आनंद घुसळे, विरेंद्र वाघ, किशोर जाधव, माजी सरपंच द्वारकादास घोडके, धनाजी नागे, राजेश निकाळजे, रामदास निंभोरे, राहुल बनकर, ईश्वर देवकर, किरण गायकवाड, राजन घुसळे, सौरव केदारे, प्रवीण घुसाळे, राज ढवळे, रोहित वाघमारे, करण देवकर, चिरायु ढवळे, राज जाधव, सचिन निकाळजे, छबू कांबळे, आदी उपस्थित होते.