Dhananjay Munde

'गुंगी गुडिया' वादावर धनंजय मुंडेंचा काँग्रेसवर हल्लाबोल; सुनेत्रा पवारांविषयीच्या वक्तव्याचा निषेध

​​​​​​​राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' अशी उपमा दिल्यानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे.

'गुंगी गुडिया' वादावर धनंजय मुंडेंचा काँग्रेसवर हल्लाबोल; सुनेत्रा पवारांविषयीच्या वक्तव्याचा निषेध

Dhananjay Munde

'252 दिवस माझी मीडिया ट्रायल झाली'; बीड दौरा, पत्रकार परिषद आणि काँग्रेसच्या भूमिकेवर धनंजय मुंडेंची सडेतोड प्रतिक्रिया

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' अशी उपमा दिल्यानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उडी घेत काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे. सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेले वक्तव्य हे त्यांच्या विरोधातील द्वेष आणि तिरस्कार दर्शवणारे असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला.

धनंजय मुंडे म्हणाले, सुनेत्रा पवार यांना 'गुंगी गुडिया' म्हणण्यापूर्वी काँग्रेसने स्वतःचा इतिहास तपासावा. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही विरोधकांनी याच शब्दांत हिणवले होते. मात्र, त्यांनी आपल्या कामगिरीतून सक्षम नेतृत्व सिद्ध केले. सुनेत्रा पवार यांच्याबाबतही महाराष्ट्रात त्यापेक्षाही सकारात्मक अनुभव मिळेल, अशी भीती काँग्रेसला वाटत असल्यामुळेच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमातून अशी टीका करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी काँग्रेसवर इतर मुद्द्यांवर मौन बाळगल्याचाही आरोप केला. झारखंडमधील पेपरफुटी प्रकरणावर काँग्रेसने भूमिका मांडली असती तर अधिक योग्य ठरले असते, असे ते म्हणाले. तसेच दिल्लीतील नीट आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका नेमकी काय होती, याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सुनेत्रा पवार यांच्या अलीकडील बीड दौऱ्याचाही धनंजय मुंडे यांनी उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुनेत्रा पवार सायंकाळी पाच वाजता बीडमध्ये दाखल झाल्या आणि रात्री अकरापर्यंत विविध बैठका घेत राहिल्या. दुसऱ्या दिवशी डीपीडीसीसह अन्य बैठका पूर्ण केल्यानंतर त्या माध्यमांशी संवाद साधणार होत्या. मात्र, या पत्रकार परिषदेत केवळ निवेदन केले जाईल आणि प्रश्नोत्तरांचा भाग नसेल, याची माहिती आधीच देण्यात आली होती.

मुंडे यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या संदर्भातील विषय समोर आल्यानंतर सुनेत्रा पवार भावनिक झाल्या होत्या. त्या अत्यंत कठीण वैयक्तिक परिस्थितीतही जनतेसाठी काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा वेळी पत्रकारांनी संवेदनशीलता दाखवून प्रश्न विचारणे थांबवायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. बीडमधील बहुतांश माध्यम प्रतिनिधी जबाबदारीने काम करतात, मात्र काही जण जिल्ह्यातील वातावरण पुन्हा तापवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

धनंजय मुंडे यांनी स्वतःबाबत गेल्या काही दिवसांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरही नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, आपण 'चमत्कार' या शब्दाचा उल्लेख आपल्या प्रकृतीसंदर्भात केला होता, राजकारणाबाबत नव्हे. तसेच बीडमधील पत्रकार परिषदेदरम्यान एका शेतकऱ्याला शांतपणे बोलण्यास सांगितले असताना त्याचा विपर्यास करून 'धनंजय मुंडेंची हुकूमशाही' अशा बातम्या प्रसारित झाल्याचे त्यांनी सांगितले.

"मी दीड वर्षांपासून माध्यमांसमोर बोलत नाही. मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही, केवळ आमदार आहे. तरीही माझ्याविषयी सातत्याने नकारात्मक बातम्या दाखवल्या जात आहेत. 252 दिवस माझी मीडिया ट्रायल झाली. एका समाजघटकातील व्यक्तीला लक्ष्य करणे लोकशाहीला शोभणारे नाही," अशी खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026