Datt Shikhar Sansthan,

चिंतामण भारती यांना ५ ऑक्टोबरपर्यंत दत्त शिखर संस्थानवर प्रतिबंध

माहूरच्या दत्त शिखर संस्थानमध्ये चिंतामण भारती यांच्या उपोषणाची दखल; ५ ऑक्टोबरपर्यंत संस्थानच्या मालमत्तेवर येण्यास प्रतिबंध.

चिंतामण भारती यांना ५ ऑक्टोबरपर्यंत दत्त शिखर संस्थानवर प्रतिबंध

Datt Shikhar Sansthan,

उपोषणाची दखल; चौकशी समिती नेमणार, ५ ऑक्टोबरच्या बैठकीत अंतिम निर्णय

माहूर : दत्त शिखर संस्थान येथे चिंतामण भारती यांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची माहिती पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत मोहन भारती महाराज यांना मिळाली. महंत महाराज यांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेण्यात आली असून, चिंतामण भारती यांना ५ ऑक्टोबरपर्यंत श्री दत्त शिखर संस्थान, श्री अनुसया देवी मंदिर व संस्थानच्या इतर मालमत्तेजवळ येण्यास प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती दि. १९ रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

श्री दत्त शिखर संस्थान येथे चिंतामण भारती यांनी गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते. या आमरण उपोषणाविषयी गडाचे महंत यांनी पंचदशनाम जुना आखाड्याकडे तक्रार केली होती. महंत महाराज यांनी दिलेल्या अर्जाची तत्काळ दखल घेण्यात आली असून, अर्जाच्या चौकशीकरिता दोन दिवसांत चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती दि. ३ ऑक्टोबरपर्यंत आपला अहवाल देणार आहे.

त्यानंतर दि. ५ ऑक्टोबर रोजी श्री दत्त शिखर संस्थान येथे पंचदशनाम जुना आखाड्याची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत दि. ५ ऑक्टोबरपर्यंत चिंतामण भारती यांनी श्री दत्त शिखर संस्थान, श्री अनुसया देवी मंदिर व संस्थानच्या कुठल्याही मालमत्तेवर येण्यास सक्त मनाई घालण्यात आली आहे, अशी माहिती पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत मोहन भारती महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पंचदशनाम जुना आखाड्याचे साधू-संत उपस्थित होते. तर, राष्ट्रीय अध्यक्षांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे, असे चिंतामण भारती यांनी यावेळी सांगितले.

संबंधित सामग्री

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

Dongarkada Rastaroko Andolan: महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केल्या नंतर प्रशासनाने पंचनामे करत असल्याने दि 6 ऑक्टोबर रोजी डोंगरकडा फाटा येथे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रास्तारोको आंदोलन..

Oct 06, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
प्रेमानंद महाराजांचे आश्रम पुन्हा चर्चेत; मुलगा आणि महिला बेपत्ता...?

प्रेमानंद महाराजांचे आश्रम पुन्हा चर्चेत; मुलगा आणि महिला बेपत्ता...?

Premanand Maharaj Ashram: प्रेमानंद महाराजांच्या राधा केलि कुंज आश्रमाशी संबंधित काही घटनांमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आश्रमात आलेला 17 वर्षीय अनुज चौधरी हा मुलगा बेपत्ता झाल्याचा दावा

Oct 04, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026