मानोरा (Gavha Load Shedding) : तालुक्यातील मौजे गव्हा येथील अघोषित भारनियमन बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीचे निवेदन दि. २० जुलै रोजी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना ग्रामस्थानी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांच्या मार्फत पाठविले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, मौजे गव्हा गावात रात्रीचे ७ ते १० वाजतापर्यंत अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. या अघोषित भारनियमनमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी निर्माण होत असुन ज्येष्ठ नागरिकांना आजाराची लक्षणे जाणवू लागले आहे. (Gavha Load Shedding) उकाड्यामुळे रात्रीच्या वेळी साप, विंचू, इंगळी अश्या सरपटणाऱ्या जीवाणूपासून धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी चालू असलेले अघोषित भारनियमन त्वरित थांबविण्यात येण्याचे आदेश देण्यात यावे, असे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून कळविण्यात आले आहे. निवेदनावर सौ सुरेखा यशवंतराव इंगळे, सौ जया उंदरे, विवेक डुकरे, प्रकाश कांबळे, शिवा चौधरी, वैभव खोडे, विवेक देशमुख, बाबाराव ठाकरे, भारत निशाणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गव्हा येथील अघोषित भारनियमन बंद करावे; मुख्यमंत्री यांना निवेदन
Gavha Load Shedding: गव्हा येथे रात्रीच्या ७ ते १० वाजून होणारे अघोषित भारण नियम थांबवावे, असे मुख्यमंत्री तेव्हा ऊरज मंत्रीच्या नावाने संस्थानिक अधिकाऱ्यावर निवेदन.
Gavha Load Shedding
संबंधित सामग्री
जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळ भीषण अपघात; टँकरखाली दुचाकी घुसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू
शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात शासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
15 ऑगस्टपासून सुरु होणार 'कॉकरोच जनता पार्टी'ची देशव्यापी मोहीम!
CJP School Abhiyan: गावांतील सरकारी शाळांची दयनीय अवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कॉकरोच जनता पक्षाने (CJP) एका मोठ्या मोहिमेची घोषणा
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; उत्तर महाराष्ट्र-मराठवाड्यासह विदर्भाला यलो अलर्ट
महाराष्ट्रातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्षसंघटन व्यापक करण्यासाठी कामाला लागा: संपर्क प्रमुख चव्हाण
Latur Shiv Sena: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक भक्कम आणि व्यापक
परभणी महापालिका विशेष सर्वसाधारण सभेत चार स्विकृत सदस्यांची निवड
Parbhani Municipal Corporation: