Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > जळगाव

Ajintha Chowk Accident

जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळ भीषण अपघात; टँकरखाली दुचाकी घुसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात शासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.


जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळ भीषण अपघात टँकरखाली दुचाकी घुसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

Ajintha Chowk Accident |

विरुद्ध दिशेने आलेल्या बोलेरोला वाचवताना दुचाकीचा ताबा सुटला; एक विद्यार्थी अतिगंभीर, तर एक जण किरकोळ जखमी

जळगाव : शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात शासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीसमोर अचानक विरुद्ध दिशेने बोलेरो वाहन आल्याने चालकाचा ताबा सुटला. यानंतर दुचाकी रस्त्यालगतून जाणाऱ्या टँकरखाली गेल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

या अपघातातील मृत विद्यार्थ्याची ओळख वरुण विजय सुरवाडे अशी झाली आहे. पवन अनिल अडकमोल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (GMC) अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर नीरज रवींद्र कोचुरे याला किरकोळ दुखापत झाली आहे.

कॉलेज सुटल्यानंतर भुसावळच्या दिशेने प्रवास

वरुण, पवन आणि नीरज हे तिघेही जळगाव येथील शासकीय आयटीआयचे विद्यार्थी होते. सोमवारी कॉलेज सुटल्यानंतर तिघे एकाच दुचाकीवरून जळगावहून भुसावळच्या दिशेने निघाले होते. ट्रान्सपोर्ट नगर परिसरात पोहोचल्यानंतर समोरून अचानक विरुद्ध दिशेने बोलेरो वाहन आल्याचे समोर आले.

बोलेरोला धडक टाळण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर दुचाकी बाजूने जात असलेल्या टँकरखाली गेली आणि तिघेही अपघातग्रस्त झाले.

नागरिकांनी केली मदत; रुग्णालयात नातेवाइकांचा आक्रोश

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी वरुण सुरवाडे याला मृत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. वरुणच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालय परिसरात त्याचे नातेवाईक आणि वर्गमित्रांनी आक्रोश केला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Related to this topic: