परभणी चोरी प्रकरण

परभणीत सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेला चोरटा २४ तासात गजाआड

Parbhani Theft Case: परभणीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद करून २४ तासात पोलिसांनी ताब्यात घेतले.

परभणीत सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेला चोरटा २४ तासात गजाआड

Parbhani Theft Case

 

पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाची कारवाई...!

परभणी (Parbhani Theft Case) :  गंगाखेड शहरातील सारडा कॉलनी परिसरातील शिक्षकाच्या घरात भरदुपारी घरफोडी करून सोन्याचे दागिणे घेऊन पसार होतांना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेल्या चोरट्याला पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाच्या पथकाने २४ तासात जालना येथून ताब्यात घेत गजाआड केले आहे.

शहरातील सारडा कॉलनी परिसरात राहणारे शिक्षक संजीवकुमार व्यंकटराव गबाळे यांचे कुटुंब घराला कुलूप लावून शनिवार ९ मे रोजी बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने भरदुपारी त्यांच्या घराचे कुलूप कोंडी तोडून सोन्याचे दागिणे पळविले होते. चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. (Parbhani Theft Case) याप्रकरणी रविवार १० मे रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. गंगाखेड शहरातील गजबजलेल्या वस्तीत भरदुपारी घरफोडी झाल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेला घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणावा, असे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन परिहार, पोह.महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, पोह लक्ष्मण कांगणे, पांडुरंग तुपसुंदर, मुकेश बुधवंत, सिद्धेश्वर चाटे, माणिक डुकरे, सचिन भदरगे, नामदेव दुबे, राम पौळ, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, केशव लटपटे, निलेश परसोडे, दिलीप निलपत्रेवार, शरद सावंत, हुसेन, गायकवाड, साने, हानवते आदींनी याचा तपास घेत ही घरफोडी समर्थ नारायण मुळे रा. गंगाखेड याने केल्याची व तो जालना येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून सायबर सेलचे गणेश कौटकर यांची मदत घेत सोमवार ११ मे रोजी समर्थ मुळे यास जालना येथून ताब्यात घेत घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले १५ ग्राम पेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत अंदाजे १ लाख ७१ हजार ५०० रुपये व रोख १६ हजार रुपये असा एकूण १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस मुद्देमालासह गंगाखेड पोलीस ठाण्यात हजर केले.

या (Parbhani Theft Case) गुन्ह्यात आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केल्या जात आहे. घटनेचा पुढील तपास गंगाखेडचा ग्रेड पोउपनि.युसूफ खान पठाण, पोशि. परसराम परचंवाड करीत आहेत.

संबंधित सामग्री

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026