आ. श्वेताताई महाले पाटील 

चिखलीकरांना शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी वचनबद्ध!

MLA Shweta Mahale Patil: चिखलीतील नगरपरिषदने पेनटाकळी धरणावरून पाण्याच्या मुख्य पाईपलाइनवर १३ ठिकाणी असलेल्या लिकेजमुक्तीसाठी काम सुरू केले आहे.

चिखलीकरांना शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी वचनबद्ध!

MLA Shweta Mahale Patil

 

लिकेजमुक्त जलवाहिनीमुळे पाणीपुरवठ्यात मोठी वाढ: आ. श्वेताताई महाले पाटील 

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी 24 मे रोजी शहरातील नगर परिषद अंतर्गत पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टर प्लांटची पाहणी करून नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या पुरवठ्याबाबत सविस्तर आढावा घेतला. शहरातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी सुरू असलेल्या कामांची माहिती घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तसेच आवश्यक त्या सूचना दिल्या.

चिखली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेनटाकळी धरणावरून येणाऱ्या मुख्य पाईपलाईनवर तब्बल १३ ठिकाणी लिकेज होते. नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, पाणी पुरवठा सभापती व सर्व नगरसेवकांनी मेहनत घेऊन ही सर्व लिकेज बंद केली. पूर्वी या लाईनमधून ७० लाख लिटर पाणीपुरवठा होत होता. आता लिकेज बंद झाल्यानंतर तब्बल ९० लाख लिटर पाणी उपलब्ध होत असून फिल्टर प्रक्रियेनंतर नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होणार आहे.

चिखली शहरातील नागरिकांना दरडोई व शुद्ध पाणी मिळावे यासाठी सर्व लोकप्रतिनिधी तत्पर आहेत. सध्या सुरू असलेली अमृत वाढीव पाणी पुरवठा योजना लवकर पूर्ण करून नागरिकांना दररोज पाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशी माहिती आमदार श्वेताताई महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी दिली

यावेळी नगराध्यक्ष  पंडितदादा देशमुख, रामदासभाऊ देव्हडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सागर पुरोहित, पाणी पुरवठा सभापती दत्ता सुसर, बांधकाम सभापती सुहास शेटे, कपिल खेडेकर, नगरसेवक दीपक वाधवाणी, दीपक खरात, सुरेंद्र ठाकूर, राम बनसोडे, गटनेते अमोल खबूतरे, बाळू जाधव, चेतन देशमुख, सिद्धेश्वर ठेंग यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

आगीतील जखमी कर्मचार्‍यांना प्रत्येकी १ लाखाची मदत: नगराध्यक्षा रेखाताई बांगर

आगीतील जखमी कर्मचार्‍यांना प्रत्येकी १ लाखाची मदत: नगराध्यक्षा रेखाताई बांगर

Municipal President Rekhatai Bangar: शहरांमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग लागून घडलेल्या घटनेत आगीत होरपळलेल्या जखमी नगरपालिका कर्मचार्‍यास प्रत्येकी एक लाखाची मदत नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम  बांगर

Oct 06, 2026
चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
दीड कोटींच्या सफाई टेंडरनंतरही कळमनुरी घाणीतच!

दीड कोटींच्या सफाई टेंडरनंतरही कळमनुरी घाणीतच!

Kalamnuri Municipal Safai Tender: शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचे सफाई टेंडर काढले असतानाही शहरातील अस्वच्छता कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Oct 02, 2026
सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

Chikhli Seva Sankalp Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान

Oct 02, 2026