विरोधी पक्षाच्या आक्रमक भूमिकेला यश; चिखलीमध्ये आजपासून पाणीपुरवठा पूर्ववत

गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या चिखलीकरांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने घेतलेल्या भूमिकेला अखेर यश आले.

विरोधी पक्षाच्या आक्रमक भूमिकेला यश; चिखलीमध्ये आजपासून पाणीपुरवठा पूर्ववत

Chikhli Water Crisis

काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांच्या दबावानंतर प्रशासनाच्या हालचाली

चिखली (Chikhli Water Crisis) : गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या चिखलीकरांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला अखेर यश आले असून प्रशासनाने तातडीने हालचाली करत आजपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला आहे.

शहरात १५ ते २० दिवसांनी होणारा पाणीपुरवठा, नागरिकांची वाढती गैरसोय आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नगरपरिषद प्रशासनाला थेट इशारा दिला होता.

त्यानंतर काल झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने पाणीटंचाईच्या मुद्द्यावर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत जाब विचारला. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. “चिखलीकरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असताना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे,” असा आरोप करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल केला.

याच पार्श्वभूमीवर आज पहाटे डॉ. इसरार, डॉ. प्रकाश शिंगणे, डॉ. अमोल लहाने, श्री. गोकुळ शिंगणे, श्री. गोपाल देव्हडे, श्री. रत्नदीप शिनगारे, श्री. उबेद अली खान, श्री. आनंद बोन्द्रे, श्री. प्रशांत भटकर, श्री. संतोष देशमुख व श्री. पी. एस. वायाळ यांनी थेट चिखली नगरपरिषदेच्या पाणी शुद्धीकरण केंद्रावर धडक देत प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी पाणी शुद्धीकरण केंद्रातील संपूर्ण यंत्रणा, जलसाठा, वितरण व्यवस्था तसेच शहरातील विविध भागातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना नियमित, सुरळीत व वेळेवर पाणीपुरवठा करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या. नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावामुळे प्रशासनाने अखेर कामाचा वेग वाढवत आवश्यक उपाययोजना केल्या असून आजपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. “चिखलीकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष सुरूच राहील. नागरिकांना वेठीस धरणारा कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही,” असा इशाराही यावेळी विरोधी पक्षाच्या वतीने देण्यात आला.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
आगीतील जखमी कर्मचार्‍यांना प्रत्येकी १ लाखाची मदत: नगराध्यक्षा रेखाताई बांगर

आगीतील जखमी कर्मचार्‍यांना प्रत्येकी १ लाखाची मदत: नगराध्यक्षा रेखाताई बांगर

Municipal President Rekhatai Bangar: शहरांमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग लागून घडलेल्या घटनेत आगीत होरपळलेल्या जखमी नगरपालिका कर्मचार्‍यास प्रत्येकी एक लाखाची मदत नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम  बांगर

Oct 06, 2026
ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!

आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!

Asola Khurd water shortage: मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथे सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गावातील दोन्ही तलाव आणि कारपा व आसोला खुर्द शिवार

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026