खंडाळा (मकरध्वज) येथे भीषण आग; ६ लाखांचे नुकसान, जीवितहानी टळली

चिखली तालुक्यातील खंडाळा (मकरध्वज) येथे शुक्रवारी सकाळी सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

खंडाळा (मकरध्वज) येथे भीषण आग; ६ लाखांचे नुकसान, जीवितहानी टळली

Chikhli Fire

चिखली (Chikhli Fire) : चिखली तालुक्यातील खंडाळा (मकरध्वज) येथे शुक्रवारी सकाळी सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लक्ष्मण सूर्यभान भुतेकर यांच्या घराला अचानक आग लागून संपूर्ण घर व घरातील साहित्य जळून खाक झाले.

चिखली शहरापासून जवळच असलेल्या या परिसरात लागलेली आग काही क्षणातच भडकली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या आगीत टीव्ही, पंखे, घरगुती साहित्य, धान्य, कपडे तसेच सोन्या-चांदीचे दागिने जळून नष्ट झाले. पंचनाम्यानुसार सुमारे ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील जनावरे आगीच्या झळा बसून जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

​​​​​​​

घटनेची माहिती मिळताच तलाठी प्रभाकर गवळी व संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, नुकसानग्रस्तांना मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने मदतीसाठी धावून आलेल्या रज्जाक शाह, पुरुषोत्तम जाधव, जगाराव ठेंग, बबलू पठाण, कृष्णा सपकाळ, विठ्ठल ठेंग आणि कुंदन यंगड या स्थानिक नागरिकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026