चिखली नगर परिषद

इंधन बचतीसाठी चिखली नगर परिषदेची ‘विना वाहन’ मोहीम

Chikhli Nagar Parishad: चिखली नगर परिषदने 'विना वाहन' (No Vehicle Day) मोहिमेला सुरू केले आहे, ज्या तहत शहरातील नागरिकांना इंधन बचत करण्यासाठी

इंधन बचतीसाठी चिखली नगर परिषदेची ‘विना वाहन’ मोहीम

Chikhli Nagar Parishad

 

लोकप्रतिनिधींचे पायदळ भ्रमण; नागरिकांना ‘नो व्हेईकल डे’चे आवाहन

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली (Chikhli Nagar Parishad) : 
जागतिक स्तरावर सातत्याने घटणारे इंधनाचे साठे, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि पर्यावरण संरक्षणाची गरज लक्षात घेऊन चिखली नगर परिषदेने इंधन बचतीसाठी अभिनव पुढाकार घेत ‘विना वाहन’ मोहिमेला सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत आज नगर परिषदेचे माननीय अध्यक्ष पंडितराव देशमुख, उपाध्यक्ष, सभापती तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी शहरात पायदळ भ्रमण करून नागरिकांशी थेट संवाद साधत इंधन बचतीचा संदेश दिला.

या वेळी नगर परिषदेच्या (Chikhli Nagar Parishad) सर्व लोकप्रतिनिधींनी स्वतः दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा वापर टाळून शहरात पायी फिरत एक आदर्श निर्माण केला. नागरिकांनी आठवड्यातून किंवा महिन्यातून किमान एक दिवस ‘विना वाहन’ (No Vehicle Day) पाळून आपले दैनंदिन कामकाज करावे, असे आवाहन करण्यात आले. या मोहिमेमुळे इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होण्यास मदत होणार असून, वायू प्रदूषणात घट होऊन पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे. तसेच वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांच्या आरोग्यासाठीही हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याचे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, या (Chikhli Nagar Parishad) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषदेच्या मा. मुख्याधिकाऱ्यांनी विशेष कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कार्यालयात येताना तसेच दैनंदिन कामकाजादरम्यान वाहनांचा वापर टाळावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले की, “इंधन बचत ही केवळ पैशांची बचत नसून देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यावरणाला बळकट करणारे महत्त्वाचे पाऊल आहे. चिखलीकरांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी होऊन चिखली शहर पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सहकार्य करावे.” चिखली नगर परिषदेच्या या अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, नागरिकांकडूनही ‘विना वाहन’ मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे.

संबंधित सामग्री

नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत; विखे पाटील कुटुंबाचा जागतिक राजकारणात ठसा

नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत; विखे पाटील कुटुंबाचा जागतिक राजकारणात ठसा

नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड. स्टॉकहोम मतदारसंघातून विजय; ग्रीन पार्टीच्या नेत्या म्हणून मुलांचे कल्याण व पर्यावरणावर भर देणार.

Sep 20, 2026
रात्री 8 नंतर लॉकडाऊन? पाकिस्तानातील ‘स्मार्ट लॉकडाऊन’च्या चर्चेचे नेमके सत्य काय?

रात्री 8 नंतर लॉकडाऊन? पाकिस्तानातील ‘स्मार्ट लॉकडाऊन’च्या चर्चेचे नेमके सत्य काय?

इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात चार दिवसांचा कामाचा आठवडा, सरकारी वाहनांवर निर्बंध आणि बाजारपेठांच्या वेळेत कपातीचे प्रस्ताव चर्चेत आहेत.

Sep 16, 2026
गव्हा येथील कोंडवाडा १३ ऑगस्ट पर्यंत सुरू करा! 

गव्हा येथील कोंडवाडा १३ ऑगस्ट पर्यंत सुरू करा! 

Gavha KondaVada: तालुक्यातील मौजे गव्हा येथील कोंडवाडा सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी दि. १० ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी, यांना निवेदन देवून येत्या १३ ऑगस्ट पर्यंत न्याय द्यावा

Aug 10, 2026
अमरावती जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षक पदी सौरभ जवंजाळ व अल्केश ठाकरे यांची निवड

अमरावती जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षक पदी सौरभ जवंजाळ व अल्केश ठाकरे यांची निवड

Amravati Wildlife Protector: महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण कायदा १९७२नुसार अमरावती जिल्ह्यात सौरभ जवंजाळ व अल्केश ठाकरे वन्यजीव रक्षक म्हणून निवडले गेले आहेत. या पदावर नियुक्ती हा जागतिक वन्यजीव संरक्षण

Jul 15, 2026
हिंगोलीत वनविभागाची तत्परता; शेततळ्यात अडकलेल्या चार निलगायांना जीवदान

हिंगोलीत वनविभागाची तत्परता; शेततळ्यात अडकलेल्या चार निलगायांना जीवदान

हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या चार निलगाय शेततळ्यात पडल्याची घटना घडली.

Jun 26, 2026