बुलडाणा माजी सैनिक

बुलडाण्यात माजी सैनिकांसाठी आरोग्य सेवेला नवे बळ..

Buldana ex-servicemen: बुलडाणा येथे उभारण्यात येणाऱ्या दवाखान्याचे भूमिपूजन मेजर जनरल नवतेज सिंह सोहल यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बुलडाण्यात माजी सैनिकांसाठी आरोग्य सेवेला नवे बळ..

Buldana ex-servicemen

कमांडिंग मेजर जनरलच्या हस्ते दवाखान्याचे भूमिपूजन!

बुलडाणा (Buldana ex-servicemen) : येथील गायरान, सागवान परिसरात केंद्र शासनाच्या माजी सैनिक अंशदायी स्वास्थ योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या दवाखान्याचे भूमिपूजन शनिवार ११ एप्रिल रोजी उत्साहात पार पडले. नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया चे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल नवतेज सिंह सोहल (सेना मेडल) यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. यावेळी (Buldana ex-servicemen) संबंधित दवाखान्याच्या बांधकामासाठी जागा अधिकृतरित्या ठेकेदारांकडे सुपूर्द करण्यात आली. भविष्यात या दवाखान्याचा लाभ सुमारे १७,०७४ माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना होणार असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

कार्यक्रमास कर्नल सुहास जतकर (बुलडाणा), कर्नल राजीव कौशिक (नागपूर), लेफ्टनंट कर्नल विनीत पठाणिया, कर्नल अनुपम श्रीवास्तव (भुसावळ मिलिटरी स्टेशन), तसेच कर्नल अभय शंकर मुखर्जी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अधिकाऱ्यांनी स्थानिक वैद्यकीय तज्ज्ञांशी संवाद साधत माजी सैनिकांना आरोग्य सेवा पुरविताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. यात डॉ. दीपक लद्दड, डॉ. शोन चिंचोले, डॉ. विवेक मोरे, डॉ. काटकर, डॉ. नितेश छाजेड आणि चिखली येथील डॉ. जवंजाळ यांचा सहभाग होता.

तसेच सुभेदार मेजर अशोक शेळके व माजी सैनिक स्वास्थ योजना समितीच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. यानंतर बुलडाणा येथील विद्यमान माजी सैनिक दवाखान्यात भेट देऊन सैनिक व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत सेवा सुविधांची माहिती घेण्यात आली.

संबंधित सामग्री

शी जिनपिंग यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका?, उत्तराधिकारी जाहीर केल्यास तख्तापलटाची भीती

शी जिनपिंग यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका?, उत्तराधिकारी जाहीर केल्यास तख्तापलटाची भीती

Chinese President Xi Jinping: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत आणि चीनमधील अंतर्गत सत्तासंघर्षाबाबत खळबळजनक दावा, जिनपिंग यांना गेल्या काही काळात दोन वेळा स्ट्रोक आल्याचा दावा

Sep 06, 2026
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! नागपूरच्या दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! नागपूरच्या दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार

National Sports Awards: क्रीडा मंत्रालयाने आज अर्जुन पुरस्कार 2025 साठी निवड झालेल्या खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी देशातील 17 खेळाडूंची अर्जुन पुरस्कार

Aug 18, 2026
लक्ष्मी मित्तल यांच्या स्टील प्लांटवर रशियाचा हल्ला; दोघांचा मृत्यू तर 14 जखमी

लक्ष्मी मित्तल यांच्या स्टील प्लांटवर रशियाचा हल्ला; दोघांचा मृत्यू तर 14 जखमी

Lakshmi Mittal Factory Attack: भारतीय उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या मालकीच्या आर्सेलरमित्तल क्रिव्ही रिह या युक्रेनमधील प्रमुख पोलाद प्रकल्पावर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात...

Aug 17, 2026
प्रतीक्षा साबळेची रांगोळी ठरली आकर्षणाचे केंद्र

प्रतीक्षा साबळेची रांगोळी ठरली आकर्षणाचे केंद्र

Independence Day Rangoli: स्वातंत्र्य दिनानिमित्त रिसोड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर साकारण्यात आलेली आकर्षक आणि हुबेहूब फौजी जवानाची रांगोळी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली

Aug 16, 2026
शेलसूरचे सुपुत्र हवालदार हरिदास कापसे कर्तव्य बजावताना शहीद

शेलसूरचे सुपुत्र हवालदार हरिदास कापसे कर्तव्य बजावताना शहीद

Martyr Haridas Kapse: अतिउंचावरील (हाय अल्टीट्यूड) अतिशय कठीण भागात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना प्राणवायूची (ऑक्सिजन) पातळी खालावल्याने हृदयविकाराचा तीव्र त्रास होऊन हवालदार हरिदास मधुकर कापसे

Aug 10, 2026