लक्ष्मी मित्तल फॅक्टरी हल्ला

लक्ष्मी मित्तल यांच्या स्टील प्लांटवर रशियाचा हल्ला; दोघांचा मृत्यू तर 14 जखमी

Lakshmi Mittal Factory Attack: भारतीय उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या मालकीच्या आर्सेलरमित्तल क्रिव्ही रिह या युक्रेनमधील प्रमुख पोलाद प्रकल्पावर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात...

लक्ष्मी मित्तल यांच्या स्टील प्लांटवर रशियाचा हल्ला; दोघांचा मृत्यू तर 14 जखमी

Lakshmi Mittal Factory Attack

नवी दिल्ली (Lakshmi Mittal Factory Attack) : भारतीय उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या मालकीच्या आर्सेलरमित्तल क्रिव्ही रिह या युक्रेनमधील प्रमुख पोलाद प्रकल्पावर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. १६ ऑगस्टच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात प्रकल्पातील वीज निर्मिती आणि स्फोटभट्टीशी संबंधित महत्त्वाच्या सुविधांचे नुकसान झाले. परिणामी उत्पादन प्रक्रिया अंशतः थांबवावी लागली.

युक्रेनमधील क्रिव्ही रिह हे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे गृहनगर असून, युद्धाच्या काळात या शहराला वारंवार लक्ष्य करण्यात आले आहे. आर्सेलरमित्तलने हल्ल्यामुळे उत्पादनाशी संबंधित महत्त्वाच्या यंत्रणांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. (Lakshmi Mittal Factory Attack) कंपनीकडून नुकसानग्रस्त सुविधांचे परीक्षण करून कामकाज पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनकडून डागण्यात आलेले ८२२ ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी युक्रेननेही रशियाच्या विविध भागांवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले केले.

या परस्पर हल्ल्यांमुळे औद्योगिक आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवरील धोका वाढला आहे. आर्सेलरमित्तल क्रिव्ही रिह हा युक्रेनमधील सर्वात मोठ्या औद्योगिक प्रकल्पांपैकी एक आहे. युद्धामुळे यापूर्वीही त्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. (Lakshmi Mittal Factory Attack) ताज्या हल्ल्यामुळे पोलाद उत्पादन आणि निर्यातीवर अतिरिक्त दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

कीव्हवर रशियाचा मोठा हल्ला; क्षेपणास्त्रांसह ड्रोनचा मारा, तीन जण जखमी

कीव्हवर रशियाचा मोठा हल्ला; क्षेपणास्त्रांसह ड्रोनचा मारा, तीन जण जखमी

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रविवारी पहाटे युक्रेनची राजधानी कीव्ह पुन्हा एकदा रशियन हल्ल्याने हादरली.

Aug 16, 2026
रशियाच्या तेलशुद्धीकरण केंद्रावर ड्रोन हल्ला

रशियाच्या तेलशुद्धीकरण केंद्रावर ड्रोन हल्ला

Russia drone attack: युक्रेनने रशियाच्या तातारस्तान प्रांतातील निझनेकाम्स्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका बालकासह 13 जणांचा मृत्यू झाला, तर 39 जण जखमी झाले. हल्ल्यात औद्योगिक परिसरासह कामगार

Aug 11, 2026