काही दिवसांचा वाद, पण इतकं टोकाचं पाऊल का?

जिल्ह्यातील करमाड परिसरात प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणीची भरदिवसा निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

काही दिवसांचा वाद, पण इतकं टोकाचं पाऊल का?

Brutal Killing

प्रेमप्रकरणातून तरुणीची निर्घृण हत्या; करमाड परिसरात खळबळ

छत्रपती संभाजीनगर (Brutal Killing) : जिल्ह्यातील करमाड परिसरात प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणीची भरदिवसा निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर–जालना महामार्गावरील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या २७ वर्षीय पूजा सुदाम गावंडे हिचा तिच्याच प्रियकराने गळा चिरून खून केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पूजा (मुळगाव चित्तेपिंपळगाव, सध्या राहणार कुंभेफळ) ही करमाड येथील पेट्रोल पंपावर नियमितपणे काम करत होती. याच वेळी सत्यम रावसाहेब गावंडे (वय ३२) हा तेथे आला. काही क्षणातच त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने पूजावर हल्ला चढवला. थेट गळ्यावर वार केल्याने पूजा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यामध्ये आरोपी अत्यंत क्रूरपणे हल्ला करताना स्पष्ट दिसत आहे. भरदिवसा, तेही वर्दळीच्या महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपावर अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पूजा आणि सत्यम यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद वाढले होते. या वादातूनच आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपी सत्यम गावंडे याला ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026
‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

दिल्ली-NCRमधील लैंगिक अत्याचारांच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाची सुओ मोटू दखल; सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेवर दिल्ली पोलिसांना सवाल.

Sep 28, 2026