हिंगोलीतील श्रीमद भागवत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा भक्तिमय सोहळा

श्रीमद् भागवत कथेनिमित्त रामलीला मैदानावर 22 मार्च रोजी भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

हिंगोलीतील श्रीमद भागवत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा भक्तिमय सोहळा

Bhagwat Katha

हिंगोली (Bhagwat Katha) : श्रीमद् भागवत कथेनिमित्त रामलीला मैदानावर 22 मार्च रोजी भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कथाकार प. पू. भाईश्री रमेशभाई ओझा यांच्या  कथेनंतर संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारून गेले होते.

कथेदरम्यान भाईश्री ओझा यांनी श्रीकृष्ण जन्माचे महत्त्व, धर्म, भक्ती आणि जीवनातील मूल्ये यांचे सुंदर विवेचन केले. त्यांच्या ओजस्वी वाणीमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. कथेनंतर भगवान श्रीकृष्ण जन्माचा सोहळा पारंपरिक पद्धतीने   साजरा करण्यात आला. रात्री साडे आठ च्या सुमारास श्रीकृष्ण जन्माची घोषणा होताच संपूर्ण परिसर "जय श्रीकृष्ण"च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

या वेळी महिला मंडळींनी पारंपरिक पद्धतीने पाळणा गात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद साजरा केला. त्यांनी भक्तीभावाने ओव्या गात वातावरण अधिकच मंगलमय केले. पाळण्यात ठेवलेल्या बालकृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण परिसरात भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शेवटी आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले आणि श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा हा सोहळा भक्तिभावात संपन्न झाला.

संबंधित सामग्री

प्रसंगावधानाने वाचले दोन जीव! लाईनमनने चालू खांबावरील वानर माता-पिल्लाला दिले जीवदान

प्रसंगावधानाने वाचले दोन जीव! लाईनमनने चालू खांबावरील वानर माता-पिल्लाला दिले जीवदान

Baby monkey life Save: खांबावर जाऊन बाधका झालेल्या वानर मातेच्या निस्वार्थपणामुळे त्याच्याही पिल्ला व शिंदे यांची सहायता करून खाजगी विद्युत खांबावर चढल्या.

Jul 12, 2026
हिंगोलीत ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोलीत ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रदर्शनाच्या उद्घाटन व आयोजन प्रसंगी राज्य समन्वयक दीपक जोशी, विभागीय व्यवस्थापक अमित सावंत, विभागीय उपव्यवस्थापक ओमकार शेटे तसेच नगरसेवक कपिल भैया खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

Jun 12, 2026
हिंगोली येथे ६ जून रोजी भव्य ‘शिवकुटुंब मेळावा’; नियोजन बैठकीत १०० कुटुंबांच्या सहभागाचा निर्धार

हिंगोली येथे ६ जून रोजी भव्य ‘शिवकुटुंब मेळावा’; नियोजन बैठकीत १०० कुटुंबांच्या सहभागाचा निर्धार

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व सर्व कक्षांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ जून २०२६ रोजी हिंगोली येथे आयोजित ‘शिवकुटुंब मेळाव्या’च्या पार्श्वभूमीवर बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

May 23, 2026
रामनवमी यात्रा महोत्सवात मानवी मूल्यांचा संदेश - दर्शनाचार्य पंडित स्वामी श्री वृजेश्वरानंद सरस्वतीजी महाराज

रामनवमी यात्रा महोत्सवात मानवी मूल्यांचा संदेश - दर्शनाचार्य पंडित स्वामी श्री वृजेश्वरानंद सरस्वतीजी महाराज

तीर्थक्षेत्र (पोहरादेवी) परिसरातील हेलिपॅडला लागून असलेल्या भक्ती वेदांत मठात गुरुवार, दि. २६ मार्च रोजी रामनवमी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Mar 26, 2026
भगवान श्री राम

भगवान श्री राम

 धर्माचे व साधूजनांचे रक्षण करण्यासाठी व दुष्टांचा नाश करण्यासाठी देव अवतरित होत असतो.

Mar 26, 2026