नाशिकमध्ये धाडसी दरोड्याचा प्रयत्न उधळला; पिस्तुलाचा धाक, कर्मचाऱ्यावर हल्ला, आरोपी पसार

पंचवटी परिसरातील हिरावाडी भागात शुक्रवारी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये धाडसी दरोड्याचा प्रयत्न उधळला; पिस्तुलाचा धाक, कर्मचाऱ्यावर हल्ला, आरोपी पसार

Attempted Robbery

नाशिक (Attempted Robbery) : पंचवटी परिसरातील हिरावाडी भागात शुक्रवारी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. ‘न्यू समृद्धी ज्वेलर्स’ या सराफी पेढीवर सहा दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दरोड्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानातील कर्मचारी आणि मालकाने दाखवलेल्या धाडसामुळे आरोपींचा डाव फसला आणि त्यांना पळ काढावा लागला.

ही घटना रात्री सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. हिरावाडी रस्त्यावर नंदिनी अगरबत्तीसमोर विजय पगारिया आणि नैना पगारिया यांचे ‘न्यू समृद्धी ज्वेलर्स’ हे दुकान आहे. दुकान बंद करण्याची तयारी सुरू असतानाच सहा संशयित ग्राहकांच्या वेशात आत शिरले. काहींनी चेहऱ्यावर फडके किंवा मास्क बांधले होते, तर एकाने हेल्मेट घातले होते. सुरुवातीला ते सामान्य ग्राहक असल्याचे भासवत होते, मात्र काही क्षणांतच त्यांनी पिस्तूल आणि धारदार शस्त्रे बाहेर काढत सर्वांना धमकावण्यास सुरुवात केली.

दरोडेखोरांनी काउंटरवरील दागिन्यांचे बॉक्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मचारी अमित श्रीश्रीमाळ यांनी प्रसंगावधान राखत विरोध केला. त्यांच्या या धाडसामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलाच्या बटाने तसेच धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात श्रीश्रीमाळ जखमी झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे दुकानात एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, दुकानाच्या मालक नैना पगारिया यांनीही धैर्य दाखवत दरोडेखोरांना प्रतिकार केला. कर्मचारी आणि मालकाकडून होणारा वाढता प्रतिकार पाहून आरोपींचा धीर खचला आणि त्यांनी काहीही हाताला न लागता तेथून पळ काढला. ते दोन ते तीन दुचाकींवरून आले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात असून, घटनेनंतर ते मुंबई-आग्रा महामार्गाने इगतपुरीच्या दिशेने पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे हिरावाडी सारख्या वर्दळीच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, रात्रीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दुकानातील संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील आणि पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. या फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

जखमी कर्मचारी अमित श्रीश्रीमाळ यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रात्रभर मोहीम राबवली आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसमोर वैवाहिक संकट. आठ महिन्यांची गर्भवती असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून १६ ऑक्टोबरला कोर्टात हजेरी आहे.

Oct 04, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026