जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

बियाणे तक्रारींचे तातडीने निवारण करुन दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा

Collector Rahul Gupta: बियाणे जिल्ह्यातील बियाणे कंपन्यांना बोगस बियाणे विक्रित करण्यासाठी कठोर काळ्याशी युक्त करून, शेतकऱ्यांच्या तक्रारांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश

बियाणे तक्रारींचे तातडीने निवारण करुन दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा

Collector Rahul Gupta

 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींचा आढावा

हिंगोली (Collector Rahul Gupta) : शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या बियाणे तक्रारींचे तातडीने व पारदर्शक पद्धतीने निवारण करावे. तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे तक्रारींच्या अनुषंगाने बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, कृषी विकास अधिकारी अतुल वायसे तसेच विविध बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी जिल्ह्यात प्राप्त झालेल्या बियाणे तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित बियाणे कंपन्यांनी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच प्राप्त तक्रारींवर कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती सादर केली. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी समन्वयाने काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

संबंधित सामग्री

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने पुन्हा दुसर्‍यांदा बनावट फेसबुक अकाऊंट

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने पुन्हा दुसर्‍यांदा बनावट फेसबुक अकाऊंट

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नावाने आणि फोटोचा वापर करून काही अज्ञातांनी सोशल मीडियावर बनावट (फेक) फेसबुक प्रोफाइल तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Sep 22, 2026
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा; गुणवत्तेला प्राधान्य द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा; गुणवत्तेला प्राधान्य द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta: बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे जुन्या तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य

Sep 15, 2026
हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल सादर करा

हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल सादर करा

Collector Rahul Gupta: जिल्ह्यातील पावसाचा खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर व वस्तुनिष्ठ असा तालुका, पीक

Sep 15, 2026
पोळा सणामुळे वसमत-औंढा नागनाथ रस्ता दोन दिवस बंद

पोळा सणामुळे वसमत-औंढा नागनाथ रस्ता दोन दिवस बंद

Collector Rahul Gupta: पोळा व कर हा सणानिमित्त हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी भरणाऱ्या बैलांच्या मोठ्या यात्रेमुळे वसमत ते नागेशवाडी दरम्यानचा रहदारीचा रस्ता दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश

Sep 08, 2026