जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने पुन्हा दुसर्‍यांदा बनावट फेसबुक अकाऊंट

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नावाने आणि फोटोचा वापर करून काही अज्ञातांनी सोशल मीडियावर बनावट (फेक) फेसबुक प्रोफाइल तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने पुन्हा दुसर्‍यांदा बनावट फेसबुक अकाऊंट

Collector Rahul Gupta

 

नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन

हिंगोली (Collector Rahul Gupta) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नावाने आणि फोटोचा वापर करून काही अज्ञातांनी सोशल मीडियावर बनावट (फेक) फेसबुक प्रोफाइल तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या बनावट अकाउंटवरून नागरिकांना मेसेज पाठवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असून, नागरिकांनी अशा कोणत्याही आवाहनाला किंवा मेसेजला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांच्या नावाचे हुबेहूब फेसबूक अकाउंट तयार केले आहे. या अकाउंटवर जिल्हाधिकार्‍यांचे अधिकृत फोटो वापरून ते खरे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा बनावट खात्यांमधून नागरिकांना अथवा शासकीय कर्मचार्‍यांना वैयक्तिक मेसेज पाठवणे, आर्थिक मागणी करणे किंवा संशयास्पद लिंक्स पाठवण्याचे प्रकार घडू शकतात. 

हा प्रकार निदर्शनास येताच  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी तातडीने याची दखल घेतली आहे. संबंधित बनावट फेसबुक प्रोफाइलबाबत सायबर  पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.  जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने आलेल्या कोणत्याही संशयास्पद मेसेजला उत्तर देऊ नका. जर कोणाकडून पैशांची मागणी किंवा वैयक्तिक माहिती विचारली जात असेल, तर त्वरित ब्लॉक करा. अशा प्रकारचा मेसेज आल्यास स्थानिक सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी आणि अफवा किंवा बनावट अकाउंट्सला बळी पडू नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

दरम्यान भाजपचे युवानेते गोल्डी प्रशांत सोनी यांनाही यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने अशाच बनावट आयडीव्दारे अशाच पध्दतीचा संदेश आला होता. त्यावेळी त्यांनी ही बाब जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर सदर प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता.

टैग्स: Collector Rahul Gupta

संबंधित सामग्री

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा; गुणवत्तेला प्राधान्य द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा; गुणवत्तेला प्राधान्य द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta: बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे जुन्या तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य

Sep 15, 2026
हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल सादर करा

हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल सादर करा

Collector Rahul Gupta: जिल्ह्यातील पावसाचा खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर व वस्तुनिष्ठ असा तालुका, पीक

Sep 15, 2026
पोळा सणामुळे वसमत-औंढा नागनाथ रस्ता दोन दिवस बंद

पोळा सणामुळे वसमत-औंढा नागनाथ रस्ता दोन दिवस बंद

Collector Rahul Gupta: पोळा व कर हा सणानिमित्त हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी भरणाऱ्या बैलांच्या मोठ्या यात्रेमुळे वसमत ते नागेशवाडी दरम्यानचा रहदारीचा रस्ता दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश

Sep 08, 2026
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून शाळा व उपकेंद्राची पाहणी

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून शाळा व उपकेंद्राची पाहणी

Collector Rahul Gupta: जिल्ह्यातील विकासकामे तसेच नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळा

Sep 04, 2026