Kanhan River Suicide: गालिळपूराचें १७ वर्षीय तरुणी एका नदी पुलावरून नदीत उडी घेऊन गेले. सायंकाळी तातडीन्या मित्रांच्याजवळच, आपदामित्र व पोलिसांच्या मदतीने जिव्याचा बचाव होऊन तरुणीचा जिव..
आपदा मित्र व पोलिसांच्या तत्परतेने तरूणीचा जीव वाचला
कन्हान व कामठी पोलिसांची तातडीने घटना स्थळी धाव, उडी घेण्याचे कारण अद्याप अस्पष्ट
कन्हान (Kanhan River Suicide) : जुन्या कन्हान नदी पुलावरून एका १७ वर्षीय तरुणीने नदीत उडी मारल्याची धक्का दायक घटना शनिवारी (दि. १) ऑगस्ट ला सायंकाळी सुमारे ६ वाजता दरम्यान घडली. मात्र आपदा मित्र, जीवनरक्ष क पथक व अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तातडीच्या बचाव कार्या मुळे तरुणीचा जीव वाचवण्यास यश आले.
प्राप्त माहितीनुसार गवलीपुरा कन्हान ये़थिल रहिवासी १७ वर्षीय तरूणीने कन्हान नदीच्या जुन्या पुलावरून नदी पात्रात उडी घेतली . पाण्याच्या प्रवाहात ती वाहत जाऊन नदीतील पुलाच्या एका खांबाला (पिलर) अडकली. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच आपदा मित्र श्याम मस्के, अक्षय चतुर, जीवनरक्षक पथकाचे मनोज बावने तसेच नगरपरिषद कन्हान-पिपरी अग्निशमन पर्यवेक्षक हर्षल दाहाट यांचे मार्गदर्शनात अग्निशमन दल कर्मचारी आशिष बावनकर व अमित सांभारे आणि नगरसेवक केतन भिवगडे यानी तातडीने बचाव कार्य सुरू केले.
अथक प्रयत्नांनंतर तरुणीला सुखरूप नदीपात्रातुन बाहेर काढण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे आपल्या सहकाऱ्यांसह तसेच कामठी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून जख्मी तरुणीला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने आपदा मित्र, जिवनरक्षक दल व नगरपरिषद अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तातडीच्या प्रतिसादामुळे तरूणीला जीवनदान मिळुन मोठी दुर्घटना टळली. तरुणीने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन या प्रकरणाचा पुढील तपास कामठी पोलीस करीत आहेत.