Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

नीट पेपरफुटी प्रकरण

नीट पेपरफुटीप्रकरणी युवक काँग्रेसचा तहसीलवर धडक मोर्चा!

NEET paper leak case: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही दडपशाही करू नये, अशी मागणी


नीट पेपरफुटीप्रकरणी युवक काँग्रेसचा तहसीलवर धडक मोर्चा

NEET paper leak case |

 

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

परभणी (NEET paper leak case) : पाथरी येथे नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करत पाथरी शहर युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवार  २४ जुलें रोजी शहरात धडक मोर्चा काढण्यात आला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही दडपशाही करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शहरातील चौक बाजार येथून दुपारी दोन वाजता मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चात  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा .आ . बाबाजानी दुर्राणी यांच्यासह , कांग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थही घोषणा देण्यात आल्या.

मोर्चाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे आकेफ खान तबरेज खान दुर्राणी यांनी केले. तहसील कार्यालयात (NEET paper leak case) मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रशासनामार्फत केंद्र सरकारकडे मागण्या पाठवाव्यात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर किंवा गुन्हे दाखल करू नयेत, अशा मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली.