Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ

यवतमाळ बंद आंदोलन

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ 'यवतमाळ बंद' ला संमिश्र प्रतिसाद

Yavatmal Bandh Protest: नीट पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, व सरकारने होत असलेल्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी


दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ यवतमाळ बंद ला संमिश्र प्रतिसाद

Yavatmal Bandh Protest |

यवतमाळ (Yavatmal Bandh Protest) : नीट पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, व सरकारने होत असलेल्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावरील आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांनवर लाठीचार्ज करीत जखमी केले. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज गुरुवार २३ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला यवतमाळमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.

यवतमाळ जिल्हा वंचित बहुजन आघाडीकडून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत शहरातील संविधान चौकात ते जिल्हाधिकारी कार्यालयावर (Yavatmal Bandh Protest) धडक मोर्चा काढून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी दत्त चौक, बाजार लाइन, नेताजी चौक व इतर भागातील व्यवसायिकांना गुलाबाचे फुल देऊन बंद ठेवण्यात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले असून या मोर्चात शहरातील विविध राजकीय पक्षासह इतर सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला.