Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली मध्ये औंढा ना. पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले

जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पोलिसांच्या समय सूचकतेमुळे एका महिलेचा जीव वाचवण्यात यश आले आहे.


हिंगोली मध्ये औंढा ना पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले

Woman Rescue |

हिंगोली (Woman Rescue) : जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पोलिसांच्या समय सूचकतेमुळे एका महिलेचा जीव वाचवण्यात यश आले आहे. डायल ११२ या टोल फ्री क्रमांकावर आलेल्या कॉलमुळे ही महत्त्वाची कामगिरी शक्य झाली. 

२९ मे रोजी रात्री सुमारे १० वाजता औंढा येथील नवीन वसाहत असोला येथून किर्तन नावाच्या व्यक्तीने डायल ११२ वर कॉल केला. त्यांच्या नातेवाईक महिला गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याची माहिती त्यांनी दिली. माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, पोलीस अंमलदार अनिल नागुलकर, चालक संतोष धनवे व संतोष पवार यांनी तातडीने हालचाल केली. 

औंढा येथून असोला गावात अवघ्या १४ मिनिटांत पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे एका खोलीत मुलीने डब्यावर डबे ठेवून सिलिंगला दोरी बांधून आत्महत्येचा प्रयत्न चालवला होता. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तिला बाजूला काढले आणि आत्महत्येपासून परावृत्त केले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, वसमत यांच्यासह पोलीस निरीक्षक गणेश राहिरे आणि पथकातील सर्व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस अधीक्षक डॉ. रोहन डायल ११२ वर सतत लक्ष ठेवून असतात व पीडितांना तात्काळ मदत मिळावी यासाठी ठाणेदारांना वेळोवेळी सूचना देतात.

हिंगोली पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संकटकाळी तातडीच्या मदतीसाठी डायल ११२ या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा. हिंगोली पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related to this topic: