Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

वाघ धक्कादायक मृत्यू

रेल्वे इंजिनच्या धडकेत वाघाचा मादी बछडा जागीच ठार, दुसरा थोडक्यात बचावला...

Tiger Accidental Death: सिंदेवाही वनपरिक्षेत्रात रेल्वे इंजिनने एक पट्टेदार वाघाची मादी बछडा मारलेल्या घटनेत एका बछड्याचा मृत्यू झाला. दुसरा बछडा सुरक्षित बचावला गेला,


रेल्वे इंजिनच्या धडकेत वाघाचा मादी बछडा जागीच ठार दुसरा थोडक्यात बचावला

Tiger Accidental Death |

 

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील घटना

सिंदेवाही (Tiger Accidental Death ) : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि वन्यप्रेमींचे काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील लोनखैरी नियत क्षेत्रात (बीट) येणाऱ्या रेल्वे लाईनवर रेल्वे इंजिनच्या जोरदार धडकेत एका पट्टेदार वाघाच्या मादी बछड्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा बछडा थोडक्यात बचावल्या ची दुर्दैवी घटना आज, गुरुवारी पहाटे ५:१५ वाजताच्या सुमारास घडली.

​मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरकडून सिंदेवाहीच्या दिशेने क्रमांक ४१८२० चे रेल्वे इंजिन येत होते. राजोली गावाजवळ असलेल्या लोनखैरी बिटातील कक्ष क्र. २४७ जंगल परिसरातील रेल्वे लाईन ओलांडून पट्टेदार वाघाचे दोन बछडे जात असताना एका बछड्याला इंजिनने  जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मादी बछड्याचे डोके छिन्नविच्छिन्न (चेंदा मेंदा) होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा बछळा सुखरूप  रेल्वे ट्रॅक ओलांडली. (Tiger Accidental Death) मृत बछड्याचे वय अंदाजे १६ ते १८ महिने असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले यांनी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळ गाठले. वनविभागाने मृत वाघाचा पंचनामा करून शवविच्छेदन (Post-Mortem) केले. या अपघाताप्रकरणी रेल्वे इंजिन चालकावर वनकायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंदेवाही वनपरिक्षेत्रात गेल्या महिनाभरात वाघांच्या मृत्यूची (Tiger Accidental Death) ही दुसरी मोठी घटना आहे. गेल्या २६ एप्रिल रोजी नवरगाव-रत्नापूर शिवारात आपल्या तीन बछड्यांसह वावरणाऱ्या एका पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे तिचे तीन बछडे पोरके झाले आहेत. ती घटना ताजी असतानाच, आता सिंदेवाही जंगलात आपल्या दोन बछड्यांसह अधिवास करणाऱ्या दुसऱ्या एका वाघिणीचा एक बछडा रेल्वेच्या धडकेत दगावला. एकाच महिन्यात दोन वाघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, रेल्वे मार्ग व वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related to this topic: