Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

हरिण जीवदान

जुनिकामठी येथे हरिणाच्या पाडसाला जीवदान

Deer Life Saving : भटकी कुत्री हरिणाच्या पाडसा च्या मागे लागल्याचे लक्षात येताच जीवन रक्षक दलाच्या सदस्यांनी तातडीने धाव घेत कुत्र्यांना हुसकावुन लावले आणि पाडसाची सुरक्षित सुटका


जुनिकामठी येथे हरिणाच्या पाडसाला जीवदान

Deer Life Saving |

 

जीवन रक्षक दलाच्या चमुने कुत्र्यांच्या तावडीतुन पाडसाची सुटका; वन विभागाच्या ताब्यात

कन्हान (Deer Life Saving ) : जवळील जुनिकामठी परिसरात हरिणाच्या पाडसाचे प्राण वाचविण्याची उल्लेखनीय घटना घडली. भटकी कुत्री हरिणाच्या पाडसा च्या मागे लागल्याचे लक्षात येताच जीवन रक्षक दलाच्या सदस्यांनी तातडीने धाव घेत कुत्र्यांना हुसकावुन लावले आणि पाडसाची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर माजी उपसरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य भुषण इंगोले यांच्या पुढाकाराने वन विभागाशी संपर्क साधुन पाळस वन विभा गाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
             
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २४) जुलै ला दुपारच्या सुमा रास जुनिकामठी गावाबाहेरील शेत शिवारात हरिणाचे लहान पाडस भटकले होते. त्याचवेळी काही भटकी कुत्री त्याच्या मागे लागल्याचे पाहुन जीवन रक्षक दलाचे सदस्य आणि शेतातील नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून कुत्र्यांना दूर हाकलुन पाळस सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच माजी उपसरपंच तथा ग्रा. प. सदस्य भुषण इंगोले यांनी वन विभाग, नागपुर यांच्याशी संपर्क साधला.

सायंकाळी वन विभागाचे रेस्क्यु पथकाचे प्रतिक घाटे व भुरे हे घटना स्थळी पोहोचले आणि (Deer Life Saving) आवश्यक तपासणी नंतर हरिणाचे पाडस त्यांनी ताब्यात घेतले. या बचाव मोहिमेत भुषण इंगोले, रोशन धुर्वे, निलेश सलामे, हर्षल वाघधरे, विक्की ठाकरे, अजय उईके, राज इरपाते, महेंद्र ढोके आदी जीवन रक्षक दलाच्या सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे हरिणाच्या पाडसाचे प्राण वाचल्याने परिसरात त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related to this topic: