Breaking News
  • परभणीतील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळला, 30-40 जण दबल्याची माहिती
  • परळीत दिवसाढवळ्या अपहरण ऊसतोडणीच्या'उचल' पैशांवरून तरुणाला गाडीत टाकून पळवले
  • एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा
  • पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे
  • मान्सूनच्या विलंबामुळे मराठवाड्यात खरीप पेरण्या रखडल्या; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेला परिसरातील पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ आज पहाटे दोन मजली बिल्डिंगमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला.
  • सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे विहीरीत टेम्पो कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 40 चाळीस लाख रूपयांची मदत देण्यात आली.
  • डी.आर.डी.ओचे डॉ प्रदीप कुरुलकरवर आरोप निश्चित, खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा
  • छत्रपती संभाजी नगर येथील ATS पथकांच्या १५ टीम कडून विविध भागात धाडी

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

नर वाघ मृत्यु

विहिरीत पडून पट्टेदार नर वाघाचा दुदैवी

Male tiger death: सिंदेवाही वनपरिक्षेत्रात एका शेतातील विहिरीत पडून एका ७-८ वर्षाच्या नर पट्टेदार वाघाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. घटना २८ मेला रेल्वे इंजिनच्या धडकेत मादी वाघाचा मृत्यु


विहिरीत पडून पट्टेदार नर वाघाचा दुदैवी

Male tiger death |

 

सिन्देवाही वनपरिक्षेत्र डोंगरगाव बिटातील घटना; सव्वा महिन्यात तिन वाघाचा मृत्यु

सिंदेवाही (Male tiger death) : सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा हजारीचक येथील एका शेतातील विहिरीत पडून एका वयस्क पट्टेदार वाघाचा (नर) पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Male tiger death) झाल्याची धक्कादायक घटना आज, ३१ मे २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे वन्यजीव प्रेमी आणि वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, मौजा हजारीचक येथील शेतमालक श्री. पांडुरंग गोविंदा गजबिये यांच्या शेतशिवारातील सर्व्हे क्र. ५१ मध्ये एक तोंड उघडी असलेली (विना कठड्याची) आणि सिमेंट दगडांची विहीर आहे. या विहिरीमध्ये अंदाजे २५ ते ३० फूट खोल पाणी आहे. आज सकाळी मिलिंद धनराज गजबिये यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, सकाळी ९:०० वाजताच्या सुमारास या विहिरीच्या पाण्यात एक वाघ मृत अवस्थेत तरंगत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरवार), क्षेत्र सहाय्यक नितीन गढपायले, डोंगरगाव नियतक्षेत्र वनरक्षक एस. बी. चौधरी आणि वनकर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत तरंगत असलेला मृत वाघ (Male tiger death) बाहेर काढण्यासाठी नायलॉन दोर आणि बांबूच्या साहाय्याने अथक परिश्रम करून त्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. वनविभागाच्या प्राथमिक तपासणीनुसार, मृत वाघाचे वय अंदाजे ७ ते ८ वर्षे असून तो नर जातीचा आहे. मृत वाघाचे सर्व अवयव सुरक्षित आणि साबूत असल्याचे आढळून आले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक मा. डॉ. कुमारस्वामी एस.आर., सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) मा. अरविंद जे., NTCA चे प्रतिनिधी बंडू धोत्रे, तसेच स्वाब नेचर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष यश कायरकर यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा  पंचनामा करण्यात आला.

NTCA च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, डॉक्टर आणि वन्यजीव अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत मृत वाघाचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात आले. या समितीमध्ये:डॉ. रविकांत खोब्रागडे (पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव TATR चंद्रपूर)डॉ. विनोद बालाजी सुरपाम (पशुधन विस्तार अधिकारी, पंचायत समिती सिंदेवाही)श्री. बजरंग सामरे (पशुधन विकास अधिकारी, पेटगाव)यांचा समावेश होता. प्राथमिक निरीक्षणावरून वाघाचा मृत्यू विहिरीतील पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याची खात्री केल्यानंतर, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वनअधिकारी व पंचांच्या उपस्थितीत मृत वाघावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस.आर. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अरविंद जे. आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार या घटनेचा पुढील  तपास करत आहेत.

विशेष म्हणजे २८ मे ला रेल्वे इंजिनच्या धडकेत मादी वाघीनचा मृत्यु (Male tiger death) झाला आणि आता विहिरीत पडून अवघ्या ३ दिवसात विहीर कुजलेल्या अवस्थेत पट्टेदार नर वाघ आढळला. अशा एकाच आठवड्यात सिन्देवाही वनपरिक्षेत्रात २ वाघाचा मृत्यु झाला तर महिनाभरापूर्वी नवरगाव - रत्नापूर शिवारात एका पट्टेदार वाघीनचा मृत्यु झाला म्हणजे सव्वा महिन्यात तीन वाघाचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमी हळहळ व्यक्त करीत आहेत.

Related to this topic: