Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

वाशिम ऑनलाइन परीक्षा

आकांक्षीत जिल्हा वाशिम येथे ऑनलाइन परीक्षा केंद्र सुरू करावा!

Washim Online Exam: आकांक्षित जिल्हा वाशिममध्ये ऑनलाइन परीक्षा केंद्र स्थापनेसाठी मागणी आहे. पालकमंत्र्यांना निवेदन देऊन याचेच मागणी करून आले.


आकांक्षीत जिल्हा वाशिम येथे ऑनलाइन परीक्षा केंद्र सुरू करावा

Washim Online Exam |

 

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी

मानोरा (Washim Online Exam) : आकांक्षित वाशीम जिल्हा मुख्यालय ठिकाणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचीकरीता सुसज्ज ऑनलाईन परीक्षा केंद्र सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे धर्मगुरु आ. बाबूसिंग राठोड महाराज यांच्यामार्फत भाजपाचे प्रदेश सहसंयोजक भक्तराज राठोड महाराज यांनी निवेदन देऊन केली आहे.
   
आकांक्षीत वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती सारख्या दूरच्या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता जावे लागते.  जिल्हयात सद्यस्थितीमध्ये सरळसेवा, बॅकिंग एमपीएससी,  रेल्वे, पोलीस भरती इत्यादी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु जिल्हयात ऑनलाईन केंद्र नसल्याने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात लांब जावे लागते, यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो. ​व विशेष करून महिला विद्यार्थिनी, गरोदर व स्तनदा माता आणि दिव्यांग यांच्यावर दूरचा परिणाम होतो.

अनेक वेळा आर्थिक व कौटुंबिक अडचणींमुळे हुशार विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण होते.  विद्यार्थ्यांकरीता ही मोठी अडचण लक्षात घेता वाशीम येथील 'सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय ग्रामीण व शहरी विकास संस्था' यांनी   परिक्षेकरीता घेतला आहे. त्यासाठी आपण यासंदर्भात मान्यता द्यावी अशी विनंती पालकमंत्र्यांकडे केली आहे.